पाटील समाज अकोला तर्फे १० डिसेंबर रोजी भव्य वधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन.
उपवर मुला मुलींची नावे नोंदविण्याचे आवाहन
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
2023-10-25
अकोला - पाटील समाज अकोला तर्फे रविवार १० डिसेंबर २०२३ रोजी भव्य वधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आहे आहे. स्थानिक कौलखेड रिंग रोड परिसरातील जानोरकर मंगल कार्यालयात फार मोठ्या प्रमाणात संपन्न होणाऱ्या या मेळाव्याच्या पूर्व तयारी करीता पाटील समाज अकोलाचे अध्यक्ष अशोकराव अमानकर यांच्या अध्यक्षते खाली नुकतीच सभा संपन्न झाली.
या प्रसंगी पाटील समाज अकोला चे सचीव प्रदीप खाडे, कोषाध्यक राजेन्द्र मोहोकार, कार्याध्यक्ष सुनील जानोरकर, सहसचिव विजय बोरकर, माजी सचीव दिनकरराव सरप, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अशोक पटोकार डॉ. अशोक ओळंबे, अविनाश पाटील, सुरेश पाटील गाढे, वासुदेवराव कडु ,संतोष महल्ले, प्रा. दत्तात्रय भाकरे, निलेश पवित्रकार, राहुल शेळके, अविनाश पाटील नाकट, विक्रम जानोरकर, गजाननराव पुंडकर, संदिप पाटील महल्ले, सागर अमानकार,मधुकर महल्ले व इतर पदाधिकारी उपस्थित होते.विवाह मेळाव्याचे समन्वयक व मार्गदर्शक म्हणून या सभेत सर्वानुमते दिनकरराव सरप यांची नियुक्ती करण्यात आली.
या सभेत प्रामुख्याने समाजाचे सदस्य वाढविण्यासाठी पदाधिकऱ्यांचे तालुका निहाय दौरे आयोजीत करणे, मराठा व्यावसायीकांची यादी तयार करून त्यांना सहकार्य करणे व तरुणांना व्यवसायासाठी प्रोत्साहन व मार्गदर्शन करणे. उपवर मुलींची, मुलांची अद्यावत माहिती असलेली योगायोग पुस्तीका तयार करणे,घटस्फोट टाळण्यासाठी जनजागृती करणे, भरोसा केन्द्राच्या धर्तीवर विश्वास केन्द्र तयार करून नवपिढीस विवाहाच्या बाबतीत मार्गदर्शन करणे. पाटील समाजाची व्याप्ती व कार्य वाढविण्यासाठी युवकांची सेकंड फळी तयार करणे आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
सदर विवाह मेळाव्यात सहभागी होण्याकरिता पालकांनी आपल्या उपवर मुला- मुलींची माहिती ,२ पासपोर्ट फोटो, सविस्तर माहिती सह न्यु अनंत मेडीकल रतनलाल प्लॉट, अकोला, जानोरकर मंगल कार्यालय अकोला येथे नोंदणी करावी. या मेळाव्यात मोठ्या संख्येने भाग घ्यावा असे आवाहन अध्यक्ष अशोकराव अमानकर यांनी केले आहे.
Post Views: 198