पाम ग्रामपंचायतीत घरपट्टी घोटाळा उघडकीस...


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  18 Feb 2025, 12:08 PM
   

संतोष घरत - जिल्हा प्रतिनिधी 
पालघर : तालुक्यातील पाम ग्रामपंचायतीच्या अंतर्गत असलेल्या कारखान्यातून मिळणाऱ्या घरपट्टीत करोडो रुपयांचा अपहार झाल्याची लेखी तक्रार मा. सरपंच अशोक वडे यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी पालघर यांच्याकडे केली आहे.
    पालघर जिल्ह्यात चर्चेत असलेल्या पाम ग्रामपंचायत हद्दीत २०० च्या वर छोटे मोठे कारखाने असून हे कारखाना बांधकाम करतेवेळी उद्योग विभागाकडून उपअभियंता यांची संमती घेउनच हे बांधकाम करणे कारखाना मालकास बंधनकारक असून बांधकाम पूर्ण झाल्यानंतर  बांधकाम पूर्णत्वाचा दाखला ( BCC ) झाल्याचे संमती पत्र दिले जाते. त्या संमती पत्रात बांधकामाचे मोजमाप दर्शवले जाते त्यानुसार ग्रामपंचायत नुमना ८ मधे मोजमाप नमूद करून त्या मिळकतीची किंमत देखील दर्शवली जाते. तर नमुना ९ मधे चालू व मागील वर्षीची जमा बाकी नोंद केली जाते व तशी वसुल देखील करण्यात येते.
    परंतु पाम ग्रामपंचायतीकडून कारखाना मालकांशी संगनमत करून मोजमापाच्या निम्मा पेक्षा कमी मोजमापाची आकारणी करत ग्रामपंचायतीचे करोडो रुपयांचे नुकसान करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची मात्र मौज असल्याचे गंभीर आरोप मा. सरपंच अशोक वडे यांनी केले आहे. 
     औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट क्र - एन ७९ मे रॉयल फार्मा या कारखान्याचा एकंदरीत मोजमाप १६७३१ चौ फुट असे नमूद असताना ग्रामपंचायतीकडून मात्र ३००० चौ फुट मोजमापाची आकारणी करून १३७३१ चौ फुट प्रमाणे मोजमापाचा पैसा पदाधिकारी आपल्या खिशात ठेवून घेत असल्याची माहिती समोर येत असून लुपिन ,सॅरेक्स, सिरॉन सारख्या मोठ्या कारखानाचे नाव समोर येत असून यात काही कर्मचारी देखील सामील असल्याचे निदर्शनास येत आहे.
     दरम्यान मा.सरपंच अशोक वडे यांनी ग्रामपंचायत घरपट्टी घोटाळा  उघडकीस आणून तशी लेखी तक्रार जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांच्याकडे दाखल केलेली असून, या प्रकरणी मुख्यकार्यकारी अधिकारी भानुदास पालवे नेमकी कुठली भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    Post Views:  190


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व