मौनी विद्यापीठ निवडणूक बिनविरोध


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  13 Jun 2022, 10:16 AM
   

गारगोटी ः जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या मौनी विद्यापीठाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करण्यात पालकमंत्री, मौनी विद्यापीठाचे अध्यक्ष सतेज पाटील यांना यश आले. गुरुवारी माघारीच्या अखेरच्या दिवशी तीन गटात केवळ तीनच अर्ज शिल्लक राहिल्याने निवडणूक बिनविरोध झाली. आश्रयदाता सभासद गटातून पालकमंत्री सतेज पाटील, सामान्य सभासद गटातून मधुकर देसाई, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी गटातून प्रा. अरविंद चौगले यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. आर.डी. बेलेकर यांनी ही माहिती दिली. 
निवडणुकीसाठी इच्छुकांनी मोठ्या संख्येने अर्ज दाखल केल्यामुळे निवडणूक लागणार का, याकडे लक्ष होते. संस्थेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आश्रयदाता गटातून 10, सामान्य सभासद गटातून 17, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी गटातून 20 अर्ज दाखल केले होते. गुरुवारी माघारीचा अंतिम दिवस होता. पालकमंत्री पाटील राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आहेत. तरीही तालुक्यात बिनविरोध निवडीसाठी जोरदार हालचाली सुरू होत्या. याकामी सर्व आजी-माजी आमदारांनी सहकार्य केले. पालकमंत्री पाटील यांचे स्वीय सहाय्यक सागर राणे, विजयराव घोलपे, विश्वासू पदाधिकारी, कार्यकर्ते दोन-तीन दिवस याकामी झटले होते. पालकमंत्री पाटील यांच्या विनंतीला मान देत अनेकांनी माघार घेतल्याने बिनविरोध निवडीला यश आले. 
माघार घेतलेल्यांत आश्रयदाता सभासद गटातून ः डॉ. संजय डी. पाटील, तानाजी देसाई, कृष्णात पाटील, संतोष पाटील, शरद पाडळकर, शरद पाटील यांनी तर सामान्य मतदारसंघ गटातून राजाराम भराडे, दशरथ पाटील, कृष्णात पाटील, सुहास देसाई, इंदूबाई भराडे, यशवंत नांदेकर, मनोहर परीट, विजय सारंग, सर्जेराव देसाई, सचिन देसाई, मेघा देसाई, शितल धबाले, प्रकाश देसाई, राजू काझी, बाहुबली चांडके यांनी माघार घेतली. शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी गटातून संजय देसाई, डॉ. अशोक कांबळे, सचिन भांदिगरे, मारुती भराडे, प्रा. शशिकांत चव्हाण रत्नाकर देसाई, सचिन डेळेकर, भुजंगराव मगदुम, भास्कर देसाई, विक्रमसिंग भोसले, सचिन भुजूगडे, बाजीराव भाट, शिरीष चौगुले, संजय गिरी, दत्तात्रय कदम, अरविंद देसाई, पद्मजा शिंदे, प्रा. सुनिल मांगले यांनी माघार घेतली. 
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक, प्राचार्य अर्जुन आबीटकर, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शामराव देसाई, बाजार समिती संचालक सचिन घोरपडे, बाळासाहेब गुरव, बाजीराव चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य रणधीर शिंदे, विजय सारंग आदींसह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. 
मौनी विद्यापीठाची निवडणूक तिसर्‍यांदा बिनविरोध
मौनी विद्यापीठाची निवडणूक तिसर्‍यांदा बिनविरोध झाली. जिल्ह्यातून ही निवडणूक लागावी यासाठी बरेच जण प्रयत्नशील असतात, मात्र पालकमंत्री सतेज पाटील अतिशय जादूई पद्धतीने येथील विरोधकांना हाताळतात. आक्रमकपणे अर्ज करणारे उमेदवार माघारही तितक्याच जलदगतीने घेतात, यावरून पालकमंत्री पाटील यांची विद्यापीठ प्रशासनावर पकड घट्ट असल्याचे सिद्ध होते. 

    Post Views:  215


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व