फेरीवाल्यानो कडेला बसला तर, अपघात होण्याची शक्यता
उपसरपंच निलम संखे यांनी त्यांच्याशी सुसंवाद साधून न बसण्यास विनंती केली
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
23 Dec 2022, 8:33 AM
बोईसर : (संतोष घरत) - बोईसर ग्रामपंचायत हद्दीतील नवापूर नाका ते डीजेनगर नाका ते भीमनगर मुख्य रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूला फेरीवाले बसत असल्यामुळे पादचारी मार्ग पूर्णपणे अडवला जात असल्यामुळे नागरिकांना ये जा करण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत असून,अनेकवेळा अपघात देखील झाल्याची घटना घडली आहे.बोईसर ग्रामपंचायतीकडून बेकायदेशीर फेरीवाल्यांवर वारंवार कारवाई करून देखिल राजकीय पाठबळ असलेल्या फेरीवाले पुन्हा पुन्हा त्याच ठिकाणी ठाण मांडून बसलेले पहावयास मिळतात तर दुकानदार आपल्या समोरील फेरीवाल्यांकडून मोठ्या प्रमाणावर मासिक भाडे वसूल करून स्वतः चा फायदा करून घेत आहेत.
बोईसर ग्रामपंचायतीचे उपसरपंच निलम संखे यांनी रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या फेरीवाल्यांशी भावनिक साद घालत विनंती केली आहे की, वस्तूंची विक्री करता करता एखादा वाहन आपल्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे.अशी भावनिक साद घालत एक प्रकारे रस्त्याच्या कडेला न बसण्याची विनंती केली आहे. यावेळी उपसरपंच निलम संखे, ग्रामविकास अधिकारी कमलेश संखे,ग्रामपंचायत सदस्य,अजय ठाकूर, परशुराम दुमाडा, तेजस काठे,पंकज हाडळ व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
Post Views: 206