अकोला गार्डन कल्ब तर्फे शेवंती लागवडी संदर्भात कार्यशाळा संपन्न


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  29 Jul 2025, 2:02 PM
   

अकोला - पर्यावरणाचा व आरोग्याचा   समतोल साधणे व सर्वसामान्यांमध्ये झाडाफुलांची आवड निर्माण करणे याविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने अकोला गार्डन क्लब तर्फे  शहरात दरवर्षी विविध ठिकाणी वृक्षारोपण, वृक्षसंवर्धनाची मोहीम राबविली जाते. तसेच सर्वांना उपयुक्त अशा कार्यशाळेचे सुद्धा आयोजन केले जाते. अशीच एक कार्यशाळा नुकतीच शेवंती लागवडी संदर्भात संपन्न झाली. 
सदरहु कार्यशाळेमध्ये मध्ये शेवंती, व  गुलाब लागवड, निगा, जोपासना, परसबाग निर्मिती, कमळ लागवड व जोपासना, अँडेनियम, बोन्साय, कँक्टस निर्मिती व जोपासना, औषधी वनस्पतींची लागवड व जोपासना, हे महत्वाचे विषय समाविष्ट असतात . सबंधित कार्यशाळेचे  विषयतज्ञ उपरोक्त विषयांवर  प्रात्यक्षिकांसह  उपस्थितांना सविस्तर योग्य व संयुक्तिक मार्गदर्शन करतात.
     अकोला शहर व नजिकच्या परिसरातील नागरिकांकरिता  नुकतीच  विषयतज्ञ  श्रीकांत कोंडोलीकर  यांच्यामार्फत शेवंती लागवड निगा व जोपासना या विषयावरील कार्यशाळा संपन्न झाली. श्रीकांत कोंडोलीकर यांनी प्रात्यक्षिकासह  या विषयावर उपस्थितांना योग्य व संयुक्तिक असे सविस्तर मार्गदर्शन केले. आणि या कार्यशाळेत उपस्थितांना त्यांच्या प्रश्नांचे समर्पक उत्तर देवुन त्यांचे समाधानही केले.सदरहु कार्यशाळेत अकोला गार्डन क्लब चे उपाध्यक्ष  सुधीर राठी, माजी अध्यक्ष  जयप्रकाश पाटिल मुरूमकार, प्रकल्प प्रमुख  विजय ढवळे, क्लबच्या महिला शाखेच्या अध्यक्षा अनुराधा विजय ढवळे, उपाध्यक्षा अमिता सायानी , सचिव  श्याम गोटफोडे, सहसचिव दिनेश पारेख, कार्यकारिणी सदस्य संजय हेडा, संजय आगाशे, कोकिळा पाटिल, गजानन मालोकार, सागर प्रधान, क्लबचे सदस्य आणि अकोला शहर व परिसरातील नागरिक बहुसंख्येनी उपस्थित होते. यानंतर सुद्धा अकोला गार्डन क्लब तर्फे  उपरोक्त सर्व कार्यशाळा अशाच प्रकारे अकोला शहरात विषय तज्ञांकडून  घेण्यात येणार आहेत.तरी अकोला शहर व नजीकच्य परिसरातील जनतेनी बहुसंख्येनी हजर राहून उपरोक्त सर्व कार्यशाळांचा लाभ घ्यावा अशी विनंती अकोला गार्डन क्लब तर्फे करण्यात येत आहे.

    Post Views:  79


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व