लोकस्वातंत्र्यचे पंजाबराव व रामराव देशमुख यांना पद्मश्री मनिभाई राष्ट्रसेवा पुरस्कार!


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  04 May 2023, 8:51 AM
   

खामगांव -  बुलढाणा जिल्ह्यात सामाजिक उपक्रमांमधे सक्रिय असलेले ज्येष्ठ सेवाभावी पत्रकार व जळगाव जामोद येथील कामगार कल्याण केन्द्राचे  केंन्द्र प्रमुख  लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेचे विदर्भ विभागीय संघटन तथा संपर्क प्रमुख पंजाबराव  देशमुख व खामगावमधील सामाजिक क्षेत्रात अनेक उपक्रमातील सहभागाने सुपरिचित असलेले सैन्न्यदलातील  निवृत्त  रामराव देशमुख यांना पद्मश्री मनिभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पुणे येथे निती आयोग संलग्नित व विविध घटनात्मक संस्थांकडून मान्यताप्राप्त मनिभाई देसाई प्रतिष्ठाणाकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या दिमाखदार सोहळ्यात  महाराष्ट्रातील इतर पुरस्कारार्थींसोबत या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

      राष्ट्रीय विकासामध्ये अग्रणी आणि ग्रामविकास व लोककल्याणकारी कार्यात आयुष्य घालविणाऱ्या स्व.मनिभाई देसाई यांच्या जयंतीदिनी येरवड्यातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांकृतिक सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला.डॉ.रविन्द्र भोळे यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला  लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख व ईतर मान्यवरांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती.
              प्रवचन तथा प्रबोधनकार,अपंगसेवी व विविध क्षेत्रातील ज्येष्ठ समाजसेवक ह.भ.प.डॉ.रविन्द्र भोळे हे संस्थापक अध्यक्ष असलेल्या या संस्थेकडून गेल्या ३० वर्षापासून विविध क्षेत्रातील नामवंतांना या राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरविण्यात येते. प्रोत्साहनात्मक उर्जाशक्तीने सामाजिक आणि राष्ट्रीय विकासाच्या कार्याला गतिमान चालना देण्याचा हा मनिभाई देसाई प्रतिष्ठाणाचा उपक्रम आहे.पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात ग्रामीण जनजीवनाची व समस्यांना वाचा फोडून जनतेला सुलभ प्रशासकीय सेवा मिळाव्यात यासाठी पत्रकारितेतील लेखणीने तथा आपल्या आक्रमक व  आणि तात्विक सेवाभावी वाटचालीने समाजाच्या अवलोकनात आहेत. त्यांना मिळालेल्या या बहूमानाबध्दल त्यांचे स्नेही हितचिंतक,सामाजिक कार्यकर्ते  व पत्रकारांकडून सर्वत्र अभिनंदन होत आहे.

    Post Views:  116


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व