बाल कल्याण समिती अध्यक्ष व सदस्यांची निवड


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  07 Jun 2022, 12:19 PM
   

अकोला -  महिला व बाल विकास विभागांतर्गत बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियमानुसार काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांसाठी कार्य करणाऱ्या बाल कल्याण समिती सदस्यांची निवड राज्यपाल यांच्या आदेशानुसार नुकतीच संपूर्ण महाराष्ट्रात गठीत करण्यात आली आहे. 


अकोल्याच्या न्यायिक कार्यक्षेत्रासाठी गठीत झालेल्या बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष म्हणून ऍड. अनिता राजेंद्र गुरव - शिंदे यांचीबतर सदस्य म्हणून श्री राजेश शंकरराव देशमुख, ऍड. सौ. शिला रामेश्वर तोष्णीवाल,  प्रा. प्रांजली मनोज जयस्वाल, डॉ. विनय वसंतराव दांदळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे . कलम २७ नुसार बाल कल्याण समिती ला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ( बेंच ऑफ मॅजिस्ट्रेट ) यांचे अधिकार प्राप्त आहेत .

    Post Views:  281


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व