अकोला गार्डन कल्ब तर्फे गुलाब कार्यशाळा


 विश्व प्रभात  01 Sep 2025, 9:23 AM
   

सर्वसामान्यांमध्ये झाडाफुलांची आवड निर्माण व्हावी आणि आरोग्याचा व पर्यावरणाचा समतोल साधण्याच्या उद्देशाने  घरासमोरील,  गच्चीवरील तसेच शेतामधील उपलब्ध व  उपयुक्त जागेत इतर  फुल झाडांसोबतच सर्वांचे आवडते, सुंदर, मनमोहक,  रंगबिरंगी, आकर्षक देशी  विदेशी जातींच्या गुलाबांच्या फुलांची झाडं शास्त्रोक्त पध्दतीने व्यवस्थित लावता यावीत याकरिता  नुकतीच गुलाब लागवड निगा व जोपासना या महत्वाच्या विषयावर अकोला गार्डन कल्ब तर्फे गुलाबा च्या झाडाची निगा व काळजी या सदर्भात   एक कार्यशाळा संपन्न झाली . 
सदरहु महत्वाच्या विषयावर विषयतज्ञ व  क्लबचे पदाधिकारी सौ. कोकिळा जयप्रकाश पाटील व श्री जयप्रकाश पाटील मुरूमकार यांनी उपस्थितांना त्यांच्या कृतीतुन  सविस्तर व सुयोग्य मार्गदर्शन केले.
गुलाबांच्या झाडांची सुयोग्य वाढ होण्याकरिता त्यांना  सेंद्रिय व रासायनीक खते, औषधी कोणती व किती प्रमाणात आणि कशी व केव्हा आपण द्यावीत याविषयी  विषयतज्ञांनी उपस्थितांना सोप्या व सरळ भाषेत  समजावुन सांगितले.
गुलाबांचे  विविध प्रकार, त्यांच्या जाती, त्यांची संभाव्य वाढ,  फुलांची निगा व जोपासना याबाबत या कार्यशाळेत उपस्थित त्यांना विशेष मार्गदर्शन केले गेले.ही कार्यशाळा सुरू असतांना
उपस्थितांच्या प्रश्नांची  उत्तरे देवुन त्यांचे शंका निरसन व समाधान सुध्दा केले गेले.
 गुलाबांची रोपटी, झाडांवरील रोगराई व किडयांवर निय॔त्रण ठेवण्यासाठी  वेळोवेळी कोणत्या रासायनीक किंवा सेंद्रिय औषधांची केव्हा व किती प्रमाणात फवारणी करावी याबाबत सुद्धा उपस्थितांना योग्य माहिती देण्यात आली.
अकोला गार्डन कल्बच्या वार्षीक फ्लाँवर शो मध्ये ठेवण्यात येणारी विदेशी गुलाब फुलांच्या जाती त्यांची प्रतवारी व वर्गवारी सुध्दा विषयतज्ञांनी सविस्तर व रितसर उपस्थितांना समजावुन सांगितले.
सदरहु गुलाब कार्यशाळेत अकोला गार्डन क्लबचे उपाध्यक्ष  सुधीर राठी, शरद कोकाटे, माजी अध्यक्ष अजय सेंगर, सचिव श्याम गोटफोडे,
मुख्य कार्यकारिणी सदस्य संजय आगाशे, सुनिल कवीश्वर, निशीकांत बडगे, संजय हेडा, प्रकल्प प्रमुख विजय ढवळे,  महिला विगच्या अध्यक्षा सौ.अनुराधा ढवळे, अमिता सायानी, मीना अनासाने, मृणाल जडे,
माधुरी दाते, कविता रहेजा, वर्षा अग्रवाल, अनिता राणे, कल्पना होनाळे, माया गोटफोडे, हिना शहा, विजय शहा, दिवाकर पाटील, माधव पाटील, दिपक शास्त्री, रतनलाल वर्मा, सोनू गुप्ता, सुमेध अनासाने, नरेश अग्रवाल,  रतनलाल वर्मा, शिवशंकर वेरूळकर, कल्बचे इतर सदस्य व परिसरातील नागरीक बहुसंख्येनी
उपस्थित होते.

    Post Views:  80


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व