युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी एअर इंडियाचे विमान बुखारेस्टला पोहोचले


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  26 Feb 2022, 12:32 PM
   

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी एअर इंडियाचे विमान बुखारेस्टला पोहोचले आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी एअर इंडियाच्या विमानाने शनिवारी सकाळी रोमानियाची राजधानी बुखारेस्टसाठी मुंबई विमानतळावरून उड्डाण केले. वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले की, फ्लाइट क्रमांक AI1943 ने मुंबई विमानतळावरून पहाटे 3.40 वाजता उड्डाण केले. युक्रेनमधून भारतीय नागरिकांना घेऊन रोमानियाहून एअर इंडियाचे विमान आज दुपारी चार वाजता मुंबईत दाखल होणे अपेक्षित आहे.

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मायदेशी परतणाऱ्या भारतीयांचे स्वागत करतील. वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले की, युक्रेन-रोमानिया सीमेवर रस्तेमार्गे पोहोचलेल्या कोणत्याही भारतीय नागरिकांना भारतीय सरकारी अधिकारी बुखारेस्टला घेऊन जातील जेणेकरून त्यांना एअर इंडियाच्या फ्लाइटद्वारे घरी आणता येईल. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी एअर इंडिया शनिवारी बुखारेस्ट आणि हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथे उड्डाणे होणार आहेत.

भारत सरकारच्या अधिकाऱ्यांशी पूर्व समन्वय साधल्याशिवाय कोणत्याही सीमेवर जाऊ नये

केंद्र सरकारसह राज्य सरकारही युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. युक्रेनमधील भारतीय दूतावासाकडून अडकलेल्या भारतीयांसाठी सूचना जारी करण्यात आली आहे. भारत सरकारच्या अधिकाऱ्यांशी पूर्व समन्वय साधल्याशिवाय कोणत्याही सीमेवर जाऊ नये, असे सांगण्यात आले आहे.

    Post Views:  261


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व