मराठा सेवा संघा तर्फे नवनिर्वाचित महापौर तसेच नगरसेवक व नगरसेविकांचा सत्कार संपन्न
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
05 Mar 2026, 8:23 AM
अकोला - अकोला महानगरपालिकेच्या नुकत्याच संपन्न झालेल्या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या सकल मराठा समाजातील महापौर,नगरसेवक व नगरसेविकांचा सत्कार समारंभ मराठा सेवा संघ तर्फे दिनांक २७ फेब्रुवारी २०२६ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता मराठा सेवा संघ कार्यालय जिजाऊ सांस्कृतिक भवन, छत्रपती संभाजी महाराज मार्ग,अकोला येथे मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. रणजीतजी कोरडे यांचे अध्यक्षतेखाली व केंद्रीय कोषाध्यक्ष अशोकराव पटोकार, प्रदेश संघटक प्राचार्य प्रशांतजी जानोळकर, केंद्रीय कार्यकारिनी सदस्य प्रा. प्रदीपराव चोरे,ज्येष्ठ मार्गदर्शक डॉ. पुरुषोत्तमजी तायडे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. सीमाताई तायडे, इंदुताई देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी विचारमंचावर महापौर शारदाताई खेडकर ,सभागृह नेता पवनदादा महल्ले, ज्येष्ठ नगरसेवक अनिलजी गरड, रणजीतजी खेडकर उपस्थित होते.
सर्वप्रथम राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब, छत्रपती शिवाजी महाराज, साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन , हारार्पण व दीपप्रज्वलन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा सचिव अंजलीताई ठाकरे यांनी जिजाऊ वंदना सादर केली. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्मृतीशेष अजित दादा पवार यांना याप्रसंगी दोन मिनिटे मौन पाळून शिवांजली अर्पण करण्यात आली. विचारमंचावरील उपस्थित मान्यवरांचा पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रीय कार्यकारिनी सदस्य प्रा. प्रदीपराव चोरे यांनी केले. केंद्रीय कोषाध्यक्ष अशोकराव पटोकार यांनी आपल्या मनोगतातून मराठा सेवा संघाचे कार्याबाबत माहिती दिली. यानंतर महापौर शारदाताई खेडकर, सभागृह नेता पवनदादा महल्ले, विनोदजी मापारी ,आशिषजी पवित्रकार, मनोजजी पाटील, पूजाताई पंकजजी गावंडे, योगिताताई गणेशराव पावसाळे, अनिलजी गरड, माधुरीताई क्षीरसागर,सोनालीताई दिनेशजी सरोदे, वैशालीताई शेळके, मंजुषाताई शेळके, पल्लवीताई गावंडे (मोरे), निकिताताई राहुलजी देशमुख, रश्मीताई प्रशांतजी अवचार, राजेश्वरजी धोटे आदी नगरसेवकांचा सन्मानचिन्ह, पुस्तक, शिवधर्म दिनदर्शिका व पुष्पगुच्छ देऊन मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेडच्या, उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.तसेच संभाजी ब्रिगेड ची माजी जिल्हाध्यक्ष पंकजदादा जायले यांचा सुद्धा याप्रसंगी त्यांनी दिव्यांगांप्रती केलेल्या कार्याबद्दल शासनातर्फे मिळालेल्या पुरस्काराचे औचित्य साधून तसेच मराठा सेवा संघाचे प्रदेश संघटक प्राचार्य प्रशांतजी जानोरकर यांना नुकताच लोकमत गौरव पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा सुद्धा यावेळी सत्कार करण्यात आला. पंकजदादा जायले यांचा सत्कार चि.दीप तुषारभाऊ जायले यांनी स्वीकारला.
या प्रसंगी सभागृह नेता पवनदादा महाले,रणजीतजी खेडकर तसेच अकोला शहराच्या प्रथम नागरिक महापौर शारदाताई खेडकर यांनी सत्काराला उत्तर दिले मराठा सेवा संघाच्या ज्येष्ठ मार्गदर्शिका प्रभाताई बाळसराफ यांनी सुद्धा आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. रणजितजी कोरडे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्र संचलन कार्याध्यक्ष किशोरजी हिंगणे तर आभार प्रदर्शन सहसचिव अमोलजी पटोकार यांनी केले.
कार्यक्रमाला मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष किशोरजी हिंगणे, ,विठ्ठलराव गाढे, सुनीलभाऊ जानोरकर,उपाध्यक्ष अरुणराव गावंडे, आर. आर. पाटील,सचिव संदीप निर्मळ, कोषाध्यक्ष अतुल अंधारे ज्येष्ठ मार्गदर्शक देवराव पाटील हागे, दिवाकरराव पाटील , विजयराव देशमुख,श्रीकांतजी बिहाडे, डॉ. विजयराव जाधव , अनिलजी विखे, सहसचिव आनंदजी पाटील सुकळीकर, अमोलजी पटोकार, न्यायदान कक्षाचे जिल्हाध्यक्ष अँड. अनिलजी लव्हाळे, श्रीकृष्णजी माळी, अविभाऊ गावंडे, दीपकजी आखरे, अँड. सुबोधजी बाळसराफ, सुधीरजी नेमाने , गणेशजी डहाळे , अजिंक्यजी खाडे, प्रशांतजी भुईभार,अक्षयजी भांगे, मनीषजी महल्ले योगेशजी पाटील रमेशजी कदम संजयजी पाटील, जिजाऊ ब्रिगेडच्या सुरेखाताई राऊत, अंजलीताई ठाकरे,डॉ. वैशालीताई कोरडे, प्रभाताई बाळसराफ , स्वातीताई हिंगणकर, जयश्रीताई जायले, उज्वलाताई फुंडकर, अँड .रूपालीताई शेजोळे, अँड .दिपालीताई जानोरकर, अँड. वैशालीताई वाकडे, प्रगतीताई देशमुख, भारतीताई नेमाने, छायाताई सपकाळ, स्नेहलताई लव्हाळे,रेखाताई पळसपगार, कार्यालयीन सचिव दिलीप देशमुख विनोद साबळे यांच्यासह मराठा सेवा संघ,संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड व विविध कक्षाची पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 61