साप्ताहिक जमानाचे संपादक श्याम पंन्नालालजी शर्मा यांची महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचे अशासकीय सदस्य म्हणून नामनिर्देशित


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  20 Jan 2023, 6:24 PM
   

साप्ताहिक जमाना चे संपादक शाम पंन्नालालजी शर्मा यांची महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचे अशासकीय सदस्य म्हणून नामांकन करण्यात आले. हिंदी, मराठी साहित्य, गद्य, गीत, कविता यांचा अभ्यासक म्हणून त्यांची ओळख आहे.
 त्यांच्या संपादनाखाली जमाना साप्ताहिकाने स्वतंत्र साहित्यिक पत्रकारितेच्या क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. ते 35 वर्षांहून अधिक काळ संपादन आणि प्रकाशन क्षेत्रात पारंगत आहेत.
त्यांचे अनेक शुभचिंतकांनी अभिनंदन केले आहे. महाराष्ट्र हिंदी साहित्य अकादमीमध्ये अकोल्याला नेहमीच स्वतःचे स्थान मिळाले आहे, ही अकोल्यातील शैक्षणिक, कला, साहित्य, सर्जनशील आणि सांस्कृतिक साधकांसाठी अभिमानाची आणि समाधानाची बाब आहे.

    Post Views:  182


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व