याप्रसंगी संस्थेचे सहयोगी अधिष्ठाता प्रा. डॉ. धनंजय दिघे यांचे शुभहस्ते विद्यापीठ ध्वजाचे ध्वजारोहण तसेच संस्थेतील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला. इयत्ता दहावीतील यशासाठी कु. मनस्वी सुधीर देशमुख तर इयत्ता बारावीतील यशासाठी चि.श्रेयस सुनील हजारे, चि. शार्दूल रत्नाकर राऊळकर, कु. आदिती श्याम देशमुख, कु. आयुषी किशोर पजई आदींना रोख बक्षीस, प्रमाणपत्र आणि गौरवचिन्ह प्रदान करण्यात आले. आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. दिघे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करत, संस्थेतील कर्मचाऱ्यांनी अधिकाधिक शेतकरी व पशुपालकाभिमुख काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली. याप्रसंगी प्रा. डॉ. मिलिंद थोरात यांनी निवड समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले तर डॉ. प्रवीण बनकर यांनी सूत्रसंचालन व डॉ. आनंद रत्नपारखी यांनी आभारप्रदर्शन केले.
महाविद्यालयाने दत्तक ग्राम म्हणून निवडलेल्या मोरगाव भाकरे जि. अकोला येथे याप्रसंगी पशुमधील वंध्यत्व निवारण शिबीर व स्वच्छ दुध निर्मिती विषयक व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन केले होते. डॉ. दिघे यांचे मार्गदर्शनाखाली डॉ. थोरात, डॉ. सुनील वाघमारे, डॉ. किशोर पजई, डॉ. महेश इंगवले, डॉ. श्याम देशमुख, डॉ. रत्नाकर राऊळकर आणि स्नातकोत्तर विद्यार्थी यांनी शिबिरात सुमारे ८० पशूंची आरोग्य तपासणी केली तर डॉ. गिरीश पंचभाई यांनी स्थानिक शालेय विद्यार्थ्यांना दुधाचे महत्व आणि ग्रामस्थांना स्वच्छ दुधनिर्मिती विषयक मार्गदर्शन केले. याप्रसंगी स्थानिक प्रगतिशील पशुपालक दिनेश भाकरे यांच्या शेतजमिनीवर जुलै २०२१ मध्ये लागवड केलेल्या DHN 10 या बहुवार्षिक चारा पिकाची महाविद्यालय चमूने पाहणी व पुढील मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या आयोजनात समन्वयक डॉ. मंगेश वडे, मोरगाव भाकरे ग्रामचे सरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले.