अकोला : यवतमाळ येथे आयोजित विभाग स्तरीय शालेय कराटे स्पर्धेत प्रभात किड्स स्कूलच्या इयत्ता नववीतील विद्यार्थीनी मनशा जवेरी हिने प्रथम क्रमांक पटकाविला असून तिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
विभागस्तरीय शालेय कराटे स्पर्धा मंगळवार दि. ७ फेब्रुवारी रोजी यवतमाळ येथे संपन्न झाली. या स्पर्धेत प्रभातच्या मनशा जवेरी हीने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले आणि १७ वर्षाखालील ६५ किलो वजनगटात प्रथम क्रमांक पटकाविला. तिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. मनशाला प्रभातच्या कराटे प्रशिक्षक संजीवनी बोंद्रे यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रभातच्या प्राचार्य वृषाली वाघमारे, उपप्राचार्य अर्चना बेलसरे, शाळा समन्वयक मो. असिफ व क्रीडा विभाग प्रमुख संतोष लोमटे यांच्यासह शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचार्यांनी मनशाचे अभिनंदन केले आहे.
Post Views: 180
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay