दिव्यांग सोशल फाउंडेशन तर्फे अंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन साजरा


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  03 Dec 2022, 6:00 PM
   

अकोला :स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे ३ डिसेंबर २०२२ रोजी अपेक्षा अपार्टमेंट २ ,गणेश नगर ,लहान उंमरी स्थित संस्थेच्या कार्यालयात अंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला .प्रारंभी दिव्यांगांचे प्रेरणास्थान डॉ.हेलन केलर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .संस्थापक अध्यक्ष प्रा.विशाल कोरडे यांनी दिव्यांग सक्षमीकरण ,रोजगार निर्मिती ,दिव्यांग समस्या व उपाय योजना या विषयावर व्याख्यान दिले .अंतरंग फाउंडेशन अकोला चे श्री.प्रशांत जोशी यांनी दिलेल्या देणगीतून अंध दिव्यांगांना पांढऱ्या काठीचे वितरण करण्यात आले .दिव्यांग महिलांनी तयार केलेल्या विविध कलात्मक वस्तूंचे प्रदर्शन यावेळी भरविण्यात आले .जानेवारी महिन्यात दिव्यांग महिलांसाठी रोजगार कार्यशाळा आयोजित केली जाणार असून दिव्यांग महिलांनी कार्यशाळेसाठी फाउंडेशनच्या हेल्पलाइन क्रमांक ०९४२३६५००९० वर नोंदणी करावी .असे आव्हान अनामिका देशपांडे यांनी केले .सदर कार्यक्रमाला ऑनलाइन पद्धतीने संपूर्ण विश्वात प्रसारित करण्यात आले .कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा.अरविंद देव ,विजय कोरडे ,पूजा गुंटीवार ,श्वेता धावडे ,अंकुश काळमेघ ,विशाल भोजने ,श्रीकांत कोरडे ,विजयकुमार वनवे व लीना बोळे यांनी सहकार्य केले .

    Post Views:  210


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व