दिनांक 23 मे ला नांदुरा येथे प्रतिभा कला विकास व बहुउद्देशीय संस्था नांदुरा आयोजित Acting Workshop ला भरपूर प्रतिसाद मिळाला. आणि याचे प्रायोजक होते DNG रेकॉर्डिंग स्टुडिओ नांदुरा. मा. आमदार श्री राजेशजी एकडे यांचा पूर्वनियोजित दौरा असल्याने या कार्यक्रमासाठी संदेश पाठवून त्यांनी शुभेच्छा दिल्यात.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते प्रतिभा कला विकास व बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष श्री दयाराम निंबोळकर तर प्रमुख पाहुणे तहसीलदार श्री राहुल तायडे सर, तसेच पी एस आय श्री धंदरे साहेब. विशेष अतिथी अभिनेत्री प्रिया सरकटे, कला महर्षी श्री रवी ठाकूर, प्रतिभा कला विकास व बहुउद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष तथा श्री संत जंगली महाराज स्कुलचे प्राचार्य श्री विश्वास मापारी, प्रतिभा संस्थेचे सहसचिव श्री श्याम पाटील, सदस्य श्री तुकाराम काटे, प्रतिभा संस्थेच्या नियोजन समितीत असलेले श्री ब्राम्हणे सर, सौ स्मिता सुरेश देशपांडे यांचीही विशेष उपस्थिती लाभली
प्रतिभा कला विकास व बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष श्री दयाराम निंबोळकर यांच्या अध्यक्षतेखाली श्री संत जंगली महाराज स्कुलच्या प्रशस्त तसेच सुसज्ज हॉल मध्ये
पार पडलेल्या या कार्यशाळेत जेष्ठ रंगकर्मी श्री रमेशजी थोरात यांनी रंगभूमी, सिरियल्स, चित्रपट यातील अभिनय कसा असावा , नवरसात्मक अभिनय म्हणजे काय, समरणशक्तीचा उपयोग कसा करावा, पाठांतर कसे करावे, तसेच पथनाट्य कसे असते, हे सर्व प्रकार स्वतः करून दाखवून प्रशिक्षणार्थींकडून करूनही घेतले.
आपल्या व्यस्त वेळेतून अभिनेत्री प्रिया सरकटे यांनी उपस्थिती लावली आणि त्यांनी त्यांचे अनुभव आणि मार्गदर्शन प्रशिक्षणार्थींना केले
त्यानंतर श्री दयाराम निंबोळकर यांनी कॅमेरा समोर कसे उभे रहावे, कॅमेऱ्यातून घेतले जाणारे विविध शॉट्स कसे असतात, त्या प्रत्येक शॉट्स मध्ये कॅमेऱ्या समोर अभिनय कसा असावा.. याचे मार्गदर्शन व्हिडीओ स्लाईड शो द्वारे समजावून सांगितले, आणि तसे शॉट्स श्री असलम खान यांनी कॅमेऱ्यासमोर प्रशिक्षणार्थींकडून करून घेतले. शूटिंग मध्ये डायरेक्टर लाईट्स, कॅमेरा, ऍक्शन अशी घोषणा करतात ते का, कशासाठी याचे प्रत्यक्ष उदाहरण बघायला मिळाले. DNG चे नृत्य दिग्दर्शक श्री चेतन इंगळे यांनी नृत्य केलेल्या प्रशिक्षणार्थींना नृत्याचे मार्गदर्शन केले. थोडक्यात या अनोख्या प्रशिक्षणामुळे प्रत्यक्ष शूटिंग कसे होते याचे ज्ञान प्रशिक्षणार्थींना मिळाले.
लगेच प्रशिक्षणार्थींनी या कार्यशाळेतुन मिळालेल्या प्रशिक्षणाच्या आधारे अभिनय करून दाखवला. या कार्यशाळेतील आणखी एक अनोखा प्रयोग म्हणजे श्री असलम खान यांनी प्रशिक्षणार्थींचे मॉडेलिंग करून घेतले. DNG स्टुडिओचे मॅनेजर व कार्यकारी निर्माता श्री माणिकराव वानखेडे यांनी या कार्यशाळेत भाग घेतलेल्या प्रत्येक प्रशिक्षणार्थींना DNG स्टुडिओच्या आगामी म्युझिक अलबम, नाटक तसेच शॉर्टफिल्म्स मधे सहभागी करून घेण्यात येईल असे आश्वासन दिले.
शेवटच्या प्रश्नोत्तराच्या तासात प्रशिक्षणार्थींच्या प्रश्नांना, शंकाना श्री रमेशजी थोरात यांनी योग्य उत्तरं देऊन त्यांचे समाधान केले. या कार्यक्रमासाठी चहा पाणी आणि नाश्त्याची व्यवस्था पी एस आय श्री धंदरे साहेब यांनी केली. तसेच ऑडिओ व्हिडीओ ची तकनिकी बाजू DNG चे साऊंड इंजिनिअर संकेत तायडे यांनी सांभाळली.
प्रतिभा संस्थेच्या प्रत्येक कार्यक्रमात झटणारे आणि कार्यक्रम यशस्वी करणारे DNG चे तरुण कार्यकर्ते आकाश बाभूळकर, चेतन इंगळे, दिव्यानंद नायसे, इमरान पठाण, संकेत तायडे, गणेश नेमाडे, दीक्षा नाईक, आदर्श धंदरे यांचं विशेष कौतुक प्रतिभा कला विकास संस्थेचे सचिव श्री माणिकराव वानखेडे यांनी केले.
Post Views: 307