विविध क्रिडास्पर्धेत जि.प. आगरकर क.महाविद्यालयाचे यश विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर निवड


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  07 Nov 2023, 5:28 PM
   

अकोला ः जिल्हा परिषद आगरकर क.महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध शालेय क्रिडा स्पर्धामधून आपला दबदबा कायम ठेवला असून राज्यस्तरावर कुच केली. 
जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रिडा परिषद बुलडाणाद्वारा मलकापुर येथे आयोजित विभागस्तर स्पर्धेत संस्थेच्या विज्ञान शाखेतील विद्यार्थी अनुप प्रविण इंगळे याची राज्यस्तरावर निवड झाली. याने 61 वजन गटात स्नॅच प्रकारामध्ये तर 50 कि. वजन गटात क्लीन व जर्क या गटात 60 की. वजन उचलून प्रथम क्रमांक प्राप्त केला. तर बॉक्सींग प्रकारात केदार कुकडे याची सुद्धा राज्यस्तरावर निवड झाली. संस्थेच्या वतीने प्राचार्य सतीश देशमुख वेणीकोठेकर यांनी रोख शिष्यवृत्ती, पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला. मुलांनी मिळविलेले यश कौतुकास्पद असून संस्थेकरीता भूषणावह असल्याची भावना प्राचार्य देशमुख यांनी व्यक्त केली. यावेळी अनुपचे प्रशिक्षक पंकज कुमार बंबले यांचेही अभिनंदन करण्यात आले. यावेळी संस्थेतील प्राध्यापक रितेन्द्र देवाळकर, आर.ओ. साकरकर, एकडे, बंड, लहरिया, नदीम, तनवीर, विक्रांत लोखंडे, बावस्कर इ. प्राध्यापक शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. 

    Post Views:  274


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व