हळदा येथील दोघांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक वाघाचा तातडीने बंदोबस्त करा.!


गावकऱ्यांचा भर पावसात पालकमंत्री व उपवनसंरक्षक यांच्या कार्यालय समोर निदर्शने
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  23 Jun 2022, 9:32 AM
   

गुलाब ठाकरे, ब्रम्हपुरी(चंद्रपूर) : मागील हप्त्यात हळदा येथे दोन दिवसात वाघाच्या हल्ल्यात दोन शेतकऱ्यांचा बळी गेला तर एक शेतकरी कसाबसा बचावला त्यामुळे हळदा सह परिसरातील जनतेमध्ये वन विभागा प्रति तीव्र असंतोष निर्माण झाला होता परन्तु   5 दिवस उलटूनही त्या नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करण्यात आला नाही किंवा ठोस उपाय योजना ही करण्यात आल्या नाही त्यामुळे गावकरी आक्रमक भूमिका घेत किसान सभेचे नेते कॉ विनोद झोडगे व   भाकप चे नेते कॉ महेश कोपुलवार यांच्या नेतृत्वात  पालक मंत्री विजय वडेटीवार यांच्या जण संपर्क कार्यालय  व वनविभाग कार्यालय समोर दि 21/6/2022 रोजी भर पावसात  तीव्र निदर्शने व धरणे आंदोलन करून घोषणाबाजी करत निवेदन देण्यात आले.
प्राप्त माहिती नुसार तालुक्यातील हळदा, बोडधा, कुडेसावली,मुडझा, बलारपुर,आवळगाव, वांद्रा, चीचगाव सह अनेक गावे मोठया जंगला लगत वसलेले आहेत,तसेंच लागूनच शेजारी वैनगंगा नदी आहे.या गावच्या जंगलात  वाघ व बिबट या हिंस्त्र प्राण्यांचा वावर मोठया प्रमाणात आहे. हे सर्व गावे कृषी प्रधान असून संपूर्ण शेती ही जंगल परिसरात व वैनगंगा नदीचे शेजारी आहे ,शेतकर्यांना  शेतीचे कामे करण्या करता जावेच लागते.त्या वेळात जंगलात व नदीचे परिसरात दबा धरून बसलेले वाघ शेतीचे कामे करीत असलेल्या शेतकऱ्यांवर हल्ला चढवून त्यांना जिवंत मारतात .तसेच रात्रीच्या वेळात गावात प्रवेश करून जनावरे,शेळया इत्यादींना फस्त करण्याचे काम दाररोज सुरु आहे त्यामुळे हळदा सह इतर गावातील जनता भयभीत झालेली असून वाघापासून संरक्षण मिळणे करिता वारंवार वनविभाग यांच्याकडे पत्र व्यवहार सुरू आहे परंतु या सर्वं गावांना वाघा पासून संरक्षण मिळणे फारच कठीण झाले असून वारंवार हळदा येथील जनता वाघाचा बळी ठरत आहेत .त्यातच 28 मार्च 2022 रोजी बोडधा येथील कवडू मेश्राम, एप्रिल महिन्यात आवळगाव येथील तुळशीराम कामडी यांचा बळी गेला .त्या नंतर 11 जून रोजी आवळगाव येथील क्षेत्रासहाय्यक करंडे यांच्या वर हल्ला झाला ते थोडक्यात बचावले,आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे  12 जून रोजी हळदा येथील  राजेंद्र अर्जुन कामडी व 14 जून 2022 रोजी त्याचं गावातील देविदास परशराम कामडी यांचा वाघाच्या हल्ल्यात बळी गेला तर त्यांचा सोबतचा शेतकरी थोडक्यात बचावला आणि यापूर्वी सुद्धा हळदा गावातील नानु राऊत गंभीर जखमी झाला होता.

            तालुक्यातील जंगलव्याप्त अनेक गावांमध्ये मागील एक वर्षा पासून आता पर्यंत वाघांच्या हल्ल्यामुळे 18 ते 20 लोकांचा बळी गेला आहे.आणि सध्या पावसाळ्याचा हंगाम सुरू झाल्याने लोकांना आपल्या  शेतीच्या हंगामाची कामे पार पाडावी लागत आहेत.आणि अश्या परिस्थितीत त्यांच्या मध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे, तसेच वाघांची दहशत आता जंगल सोडून गावा शेजारी दिसून येत आहे.या सर्व बाबींचा वनविभाग प्रशासनाने गांभीर्याने विचार करून सातत्याने हल्ले करणाऱ्या नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी निवेदनाद्वारे वारंवार करण्यात आली होती परन्तु मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष झाल्याने गावकऱ्यांना भरपावसात  तीव्र आंदोलन करावे लागले ,शेवटी आंदोलनाची दखल घेत उपवनसंरक्षक मा.मल्होत्रा साहेब यांनी मोर्चेकर्यांन सोबत चर्चा करून  वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू असल्याचे मान्य केले, सोबतच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांन सोबत गावांतील 10 लोकांची टीम गस्तीवर ठेवण्यात येणार आहेत,मागील सर्व गस्तीवर असलेल्या वन मजुरांची 1 वर्षाची मजुरी त्यांच्या खात्यात दोन दिवसात जमा करण्याचे मान्य केले, गावात उध्या पासून लगतचे झाडेझुडपे साफ करणे, गावातील जुने 13 सौरऊर्जा वरील लाईट दुरुस्ती करून नवीन 20 लाईट लावणार,हल्ल्यात मृत्यू व जखमी झालेल्या कुटुंबाला तातडीने मदत करणार,शेतकऱ्यांना 75% सबसिडी वर सौरऊर्जा कुंपण देणार,ग्यास सबसीडी वरील थकीत रक्कम तातडीने देणार असल्याचे मान्य केल्याने तात्पुरते आंदोलन मागे घेण्यात आले व पूर्तता न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला.
यावेळी किसान सभेचे जिल्हा सचिव कॉ विनोद झोडगे,भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ डॉ महेश कोपुलवार,महेंद्र ज्ञानवाडकर, हळदा येथील माजीउपसरपंच संजय लोणारे,ग्राम पंचायत सदक्ष धनराज लोणारे,, कालिदास इटनकर,ज्ञानेश्वर झरकर, मिनाक्षी गेडाम,रुपाली नखाते,सविता कामडी, लोमेश चदनखेडे,पितांबर म्हस्के बोडधा येथील सरपंच मनीषा झोडगे,ग्राम पंचायत सदक्ष उसन ठाकरे,कुडेसावली चे सरपंच चक्रधर गुरनुले, बंडू उरकुडे,जगजित सिंग टांक,भाग्यवान भोयर,संजय कामडी,मुक्ता कोरडे,प्रेमीला रोहनकर सह मोट्या संख्येने गावकरी उपस्थित होते तर वनविभागाचे सहायक उपवनसंरक्षक मा. चोपडे,रेंज ऑफीसर शेंडे,उपविभागीय पोलीस अधिकारी मा शिंदे, ठाणेदार मा.यादव सह तगडा पोलीस बंदोबस्त होता.

    Post Views:  177


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख