असे कन्या जाधवांची
राजमाता भारताची
दूरदृष्टी स्वराज्याची
जन्मदात्री शिवबाची...१
धडे दिले संस्काराचे
शिवबास ते ज्ञानाचे
थोर तुझे उपकार
स्वाभिमान भगव्याचे...२
सुखावली ती जनता
पराक्रम शिवबाचे
अभिमान मराठ्यांना
सवंगडी मावळ्याचे...३
हर विद्या पारंगत
शूर माता घडविले
माता ती रणरागिणी
पुत्रास ज्ञान अर्पिले......४
स्वप्न पुरे स्वराज्याचे
राज्य साजिरे सर्वास
भगिनींना सन्मानाने
धडे रक्षणाचे खास...५
धन्य ती जिजाऊ माता
असे आम्हा अभिमान
स्वराज्याची या हिंदवी
राष्ट्रमाता ती महान....६
अनिता देशमुख
नांदुरा (बुलढाणा)
ह.मू. कल्याण मुंबई
Post Views: 252