समाजामध्ये विधायक विचारांच्या प्रसारातून सामाजिककार्यात सक्रिय व्हावे : महेन्द्र कविश्वर
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा विचारमंथन मेळावा संपन्न
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
23 May 2022, 5:56 PM
अकोला -- सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांनी समाजात विधायक विचारांची पेरणी करण्यासाठी सक्रीय होऊन सामाजिक उपक्रमांमधील प्रत्यक्ष सहभाग वाढवावा असे आवाहन जेष्ठ पत्रकार श्री महेन्द्र कविश्वर यांनी केले.लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेच्या मासिक विचारमंथन मेळावा जठारपेठेतील जैन रेस्ट्रो येथे त्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.त्यावेळी पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.सर्वप्रथम राष्ट्रसंत तूकडोजी महाराज व समजोध्दारक गाडगे बाबा या अधिष्ठानांना पुष्पमाला अर्पण करून वंदन करण्यात आले.राष्ट्रीय किर्तनकार दिवंगत उद्धवरावजी गाडेकर यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
याप्रसंगी पत्रकार महासंघाचे मार्गदर्शक पदाधिकारी प्रा.श्री राजाभाऊ देशमुख,सौ.जया भारती व डॉ.योगेश साहू या पदाधिकाऱ्यांचे व सभासद श्री दिपक शर्मा यांचे जन्मदिनानिमित्त अभिष्टचिंतन करण्यात आले.याप्रसंगी दिव्यांग सोशल फाऊंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष प्रा.श्री विशाल कोरडे तथा दऊत लेखणीचे संपादक श्री विजय देशमुख हे विशेष अतिथी तर पत्रकार महासंघाचे संस्थापक-राष्ट्रीय अध्यक्ष- संजय एम.देशमुख व केन्द्रीय पदाधिकाऱ्यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.उपस्थित विशेष अतिथी व न्यू तापडीया नगरातील मोफत शिकवणी वर्गाचे संचालक राजेश उर्फ बॉबी जाधव या सर्वांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना शाल पुष्पगुच्छ व सन्मानपत्रे प्रदान करण्यात आली.
यावेळी प्रास्ताविकातून अध्यक्ष संजय देशमुख यांनी पत्रकार कल्याण आणि सामाजिक वाटचालीची माहिती देऊन ईतरांच्या विधायक उपक्रमांना प्रोत्साहनाचे सकारात्मक बळ देणारी विकासाच्या प्रक्रियेतील संघटनेची भूमिका विषद केली.उपस्थित मान्यवरांनी उल्लेखित पारदर्शक कार्याने देशपातळीवर नावलौकिक प्राप्तीच्या मनोदयासह सहकार्याचे अभिवचन देऊन लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या सेवाभावी उपक्रमांना शुभेच्छा व्यक्त केल्या.
या कार्यक्रमाला केंद्रीय उपाध्यक्ष सर्वश्री प्रदिप खाडे,किशोर मानकर,केंद्रीय सचिव राजेन्द्र देशमुख,कोषाध्यक्ष सिध्देश्वर देशमुख,डॉ.शंकरराव सांगळे,मार्गदर्शक पदाधिकारी अॕड.नितीन अग्रवाल,अॕड.राजेश जाधव,कादंबरीकार पुष्पराज गावंडे,जिल्हाध्यक्ष विवेक मेतकर,उपाध्यक्ष मोहन शेळके,सचिव किर्ती मिश्रा,सागर लोडम,मंगेश चऱ्हाटे,दिपाली बाहेकर,सुरेश कुलकर्णी,भानुदास कराळे,जेष्ठ पत्रकार अरूण भटकर,शेगांव,सतिश देशमुख,रविन्द्र देशमुख,अशोककुमार पंड्या,रवि पाटणे,सुरेशजी ठाकरे,प्रसाद झाडे,व इतर पत्रकार सभासद उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मोहन शेळके यांनी तर आभारप्रदर्शन सिध्देश्वर देशमुख यांनी केले.
Post Views: 232