अकोला जिल्हा नब ने अंध व अनाथ मुलांना राख्या बांधून केले खाऊचे वाटप


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  2023-08-31
   

अकोला : नॅशनल असोसिएशन फॉर दि ब्लाइंड जिल्हा शाखा अकोला तर्फे राखी पौर्णिमेचा कार्यक्रम मलकापूर येथील कन्नू भाई वोरा अंध विद्यालय व भय्यु जी महाराज सुर्यादय बालगृह येथे संपन्न झाला. या संस्थेतील अंध व अनाथ मुलांना नब तर्फे राख्या बांधून त्यांना खाऊ चे वाटप करण्यात आले. या प्रसंगी नब चे जिल्हाध्यक्ष प्रदिप खाडे, उपाध्यक्ष राम शेगोकार , सचिव ऍड नितीन गवळी सदस्य अविनाश पाटील ऍड अरुण सौदागर जिल्हा विकास अधिकारी विनोद शेगोकार सूर्यादय चे व्यवस्थापक शिवाजीराव पाटील कन्नू भाई वोरा अंध विद्यालय अमित देशमुख आदी प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाला प्रदिप खाडे व राम शेगोकार यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की तुम्ही जिद्द व चिकाटी ठेऊन चांगला अभ्यास केला तर तुमच्या जीवनात निश्चितच आनंदाचे दिवस येतील. नियतीने आपल्यावर हा असा प्रसंग का आणला? याची जराही खंत न बाळगता परिस्थितीशी हिमतीने सामना केला तर तुमचीही निश्चितच प्रगती होईल. कार्यक्रमाचे यशस्वीेते साठी ईलना चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश पोहरे, आमदार रणधीर सावरकर, विजय सारभुकन नेत्रतज्ञ डॉ श्रीराम लाहोळे, अड मंजुषा डव्हळे, नेत्रतज्ञ डॉ नितीन उपाध्ये, अन्नपूर्णा गावंडे वासुदेव चदिवाले, कु. दीपिका शेगो कार यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे संचलन अड नितीन गवळी यांनी तर आभारप्रदर्शन विनोद शेगोकार यांनी केले.

    Post Views:  187


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व