मा. राज्यपाल भगतसिंग कोसारी साहेब यांना एक अनावृत्त पत्र... !
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
01 Mar 2022, 11:58 AM
माननीय राज्यपाल महोदय
आपण छत्रपतींची उंची कदाचित विसरतात की काय? याचा आम्हाला प्रश्न पडला आहे.
ज्या कालखंडामध्ये छत्रपती होऊन गेले त्या कालखंडामध्ये समर्थ रामदासांचा कुठेच दूरान्वयानेही संबंध येत नाही असा खरा इतिहास आहे.
आपण हा इतिहास वगळून वेगळ्याच इतिहासाला उजाळा देत आहात. आपण समर्थ शिवाय छत्रपती शिवाजी महाराज अपूर्ण आहेत हा नवा स्वरचित इतिहास मांडला याला पुरावा द्यावा. अन्यथा नव्या वैचारिक व ऐतिहासिक आंदोलनास सामोरं जावं..
हा प्रश्न आमच्यासाठी व सर्व अभ्यासकांसाठी अनाकलनीय आहे. आपण हा नवा वाद उफाळून एक प्रकारची दूही महाराष्ट्रामध्ये व अवघ्या जना माणसांमध्ये निर्माण केली आहे. सबळ पुरावे नसताना असे बोलू नये. असं जुनी जाणती माणसं म्हणतात. आपण तर जुनी जाणती माणसं दिसून सुद्धा बिना पुराव्याचे बोलत आहात आणि तेही महाराष्ट्राचा खरा इतिहास न जाणता. आपल्या या विचारशक्तीची मला कीव येते.
काही विशिष्ट धर्मगुरूंना आपण पुढे आणून या नव्या गुरु शिष्य पद्धतीचा प्रचार-प्रसार करत आहात. आपल्या या जाहीर प्रगटन आ बद्दल आणि आपण मांडलेल्या आपल्या तथाकथित या मताबद्दल आम्ही आपला जाहीर निषेध व्यक्त करतो.......!
आपण हा संदेश देताना आम्हाला आपल्या इतिहासाच्या ज्ञानाबद्दल खूप कीव वाटत आहे..... समर्थांशिवाय शिवाजी महाराज नाहीत. असं वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी साहेब आपली शैक्षणिक व ऐतिहासिक ज्ञानाची गरीबी अधोरेखित होताना दिसत आहे.
मराठी भाषा गौरव दिना निमित्त आपण मराठी अस्मितेचा अपमान केला आहे गुरु शिष्याला पूर्णत्व देत असतो पण छत्रपती शिवरायांचे खरे गुरु संत तुकाराम महाराज आहेत. आणि त्यांचा कालखंड व त्यांची प्रत्यक्ष भेट हासुद्धा इतिहासाचा एक महत्वाचा दाखला आहे.
हा इतिहासाचा सबळ पुरावा असताना आपण हा नवा जावई शोध कसा लावला...?
याचे कृपया स्पष्टीकरण द्यावे .
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आपण सर्व साजरा करत आहोत. त्या अमृतमहोत्सवी वर्षांमध्ये आपण एक शासन कर्ते, एक शासनाचे प्रतिनिधी म्हणून अशी वैचारीक दिवाळखोरी मांडावी.....!
राम मंदिराची पायाभरणी होत असताना तुम्हाला समर्थ आठवतात धन्यता मानतो.
परंतु समर्था शिवाय छत्रपतींना काय अर्थ राहील. हा आपल्या वैचारिक दिवाळखोरीचा प्रश्न आपण आम्हाला खूप काय सांगू नये.
महाराष्ट्रातील जनता आपल्या कदापि माफ करणार नाही.
जगदगुरु संत तुकाराम महाराज छत्रपतींचे खरे काळानुरूप धर्मगुरू होते.
त्यांचे भले तरी देऊ कासेची लंगोटी l नाठाळाच्या माथी हाणू काठी ll
हा विचारसुद्धा दिलेला आहे हे याठिकाणी आवर्जून नमूद करावसं वाटतं.
उत्तराच्या प्रतीक्षेत...!
लक्ष्मीकांत खाबिया, अध्यक्ष
शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान पुणे, महाराष्ट्र राज्य.
९८२२०९३३६६
Post Views: 222