स्व.गोविंद मोरे स्मृती प्रित्यर्थ सांगळुद येथे आयोजित शिबीरात १२०० रुग्णांची तपासणी
अ. भा. छावा संघटनेने घेतले विक्रमी शिबीर
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
05 May 2022, 12:21 PM
अकोला ( प्रदिप खाडे) : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून स्व.गोविंद मोरे यांचे स्मृती प्रित्यर्थ अ. भा. छावा संघटनेतर्फे सांगळूद येथे शिबीरात १२०० रुग्णांची तपासणी करण्यात येवून त्यांचेवर औषधोपचार करण्यात आला. अतिशय प्रचंड प्रतिसाद लाभलेल्या या विक्री शिबीराचे उद्घाटन अकोला येथील प्रख्यात डॉक्टर दीपक मोरे यांचे हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून आर्थोपेडीक सर्जन डॉ. अभय पाटील उपस्थित होते. प्रारंभी अतिथींचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व स्व. डॉ. गोविंद मोरे यांच्या प्रेतिमेचे पूजन करण्यात आले. शिबीराचे आयोजन तथा अ. भा. छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष रणजीत काळे पाटील यांनी अतिथी व उपस्थित सर्व डॉक्टरांचे स्वागत करून प्रास्ताविक सादर केले.
सांगळूद येथील जि. प. प्राथमिक शाळेत आयोजित केलेल्या या शिबीरात सकाळपासूनच रुग्णांनी गर्दी केली होती. जवळपास सर्वच रोगांच्या तज्ञ डॉक्टरांनी या शिबीरात उपस्थित राहून रुग्णांची तपासणी केली व त्यांना औषधांचे वाटप केले. या शिबीरात प्रामुख्याने डॉ. दीपक मोरे, डॉ. अभय पाटील, डॉ. श्रीराम लाहोळे, डॉ. पुरुषोत्तम तायडे, डॉ. हर्षवर्धन मालोकार, डॉ. नितीन गायकवाड, डॉ. अमोल रावणकार, डॉ. नरेन्द्र सरोदे, डॉ. प्रणय महल्ले, डॉ. अनंत शेवाळे, डॉ. योगेश साहु, डॉ. अमर भुईभार, डॉ. प्रतिक मेंडे, डॉ. भुपेश पराडकर, डॉ. सचिन गाडेकर, डॉ. ऐध्वर्या पराडकर, डॉ. निलेश दायमा, डॉ. सागर टाले, डॉ. सुजय पाटील, डॉ. विजय खेरडे, डॉ. शेखर खोंडे, डॉ. स्वप्निल लाहोळे, डॉ. मिलींद चौखंडे, डॉ. शिवाजी ठाकरे आदी डॉक्टरांनी उपस्थित राहूलन रुग्णांची तपासणी केली.
सदर शिबीर यशस्वी करण्याकरीता डॉ. रणजीत काळे पाटील यांचेसह सांगळूद बु. च्या सरपंच सौ. शितल रणजीत काळे, उपसरपंच सौ. अमिता दीपक इंगळे, दिनेश काळे, नारायण उमाळे, करीम राजु शहा, अ. भा. छावा संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष सुधाकर पाटील, संपर्क प्रमुख योगेश गोतमारे, सचिव मनीष वाडेवाले, महेन्द्र भगत, राजु हैदर शहा, ज्ञानेश्वर गावंडे, वसंत पांडे, निलेश काळे, बंडू भालतीलक, जितेन्द्र पोफळी, शिवम भालतीलक, किशोर आखरे, मनवर शहा, अविनाश भगत, गणेश जाधव, रवि भालतीलक, शुभम काळे, स्वप्नील काळे, अंकुश भटकर, उमेश काळे, रोशन राणे, अनिकेत काळे, अक्षय भटकर, अमित दाते, हरिष आखतकार, धनंजय लांडे, सागर काळे, अजय भटकर, सोनु काकड, अनुप उज्जैनकर, पुरूषोत्तम भालतीलक, जिल्हा उपाध्यक्ष बाळुभाऊ वानखडे, जिल्हा संघटक बाळुभाऊ बगाडे, पंकज कोलखेडे, योगेश विजयकर, सचिन नागापुरे, शिवाजी अरबट, शुभम धनवर, अक्षय नागापुरे, शंतनु गोरले, चेतन म्हसने, अभिषेक देंडवे, कल्पेश कांबे, आदेश इंगळे, अभी मंगळे, गोपाल चिपडे, मिलींद अंकुरकार, पवन गवार, महादेव मोरे, गोलु तायडे, राजेश बिल्लेवार, प्रवीण शिंदे, नितेश इंगळे, पवन मोरे, महादेव तायडे, प्रमोद पागृत, नारायण उमाळे, शिवम भालतीलक, दिपक अढाऊ, उत्तम काकडे, गोविंद गावंडे, मनोहर शहा आदींनी परिश्रम घेतले.
Post Views: 228