स्वयंघोषित भावी आमदारांची बॅनर झळकायला सुरुवात....


 विश्वप्रभात  10 Sep 2024, 9:53 PM
   

संतोष घरत - जिल्हा प्रतिनिधी 
बोईसर! विधान सभा निवडणुकी अगोदरच इच्छुक उमेदवारांचे भावी आमदार म्हणून बॅनर लागले असून, झळकणाऱ्या बॅनर वरच्या भावी आमदारांना नक्की तिकीट मिळणार की भावी आमदार हे फक्त बॅनर वरच राहणार?
बोईसर विधानसभा मतदारसंघात भावी उमेदवारांची मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळत आहे. तर भावीआमदार मीच होणार म्हणून उमेदवार मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून मतदारांना आपणच तुमचे लाडके उमेदवार असल्याचं भासवत आहे. सोबत शहरातील चौकात अनधिकृत पोस्टर लावून आपल्यालाच पक्षाचे तिकीट मिळणार असल्याचे संभ्रम निर्माण करीत आहे. मात्र गेल्या पाच वर्षा अगोदर यातील काही चेहरे एकदाही मतदारसंघात फिरकल्याचे दिसले नाही तर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याच्या अगोदरच मतदारसंघात प्रकट झाले आहेत. तर मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी प्रलोभने, आमिष दाखवून त्यासाठी विविध कार्यक्रम घेऊन आपलं नाव करण्याचा प्रयत्न करीत आहे.
यातील काही भावी उमेदवार गेल्या तीन-चार महिन्यापासून मतदार संघात सक्रिय झाले तर काही उमेदवार गेल्या एक वर्षापासून, मात्र गेल्या पंधरा वर्षापासून मतदार संघात जे मेहनत करीत आहे ते मात्र शांत आहेत. मागील पाच वर्षात मतदार संघात अनेक समस्यांना नागरिक तोंड देत होते, तेव्हा मात्र नागरिकांना दिलासा देण्यासाठी किंवा त्यांच्या मदतीसाठी यातील एकही भावी आमदार उमेदवार म्हणून बिळातून बाहेर आले नाहीत. मात्र आता विधानसभेचे औचित्य साधून स्वयंघोषित भावी आमदार व भावी उमेदवारांनी मोठी गर्दी केली आहे. तर काही भावी उमेदवारांनी मतदारसंघातील नागरिकांना पैशाचे प्रलोभन देऊन त्यांना पैशाची लत लावून दिली त्यामुळे कोणताही उमेदवार आला तर तो फक्त किती पैसे खर्च करतो यावरच त्यांचे लक्ष आहे.
या मतदारसंघात अनेक समस्या आहेत मतदारसंघातील अनेक गावांना रस्ते व्यवस्थित नाहीत तर शहरात  सुसज्ज असे सरकारी दवाखाना नसल्यामुळे त्यांना गुजरात सारख्या ठिकाणी जावे लागते . हे सर्व आम्ही करून देऊ, अशाच खोटा दिलासा देण्याचे काही भावी आमदार व भावी उमेदवार प्रयत्न करत आहे. गेल्या अनेक वर्षापासून सुसज्ज अशा सरकारी दवाखान्यापासून वंचित असलेला बोईसर विधानसभा मतदारसंघ असून सर्वाधित भावी विधानसभा उमेदवारांचा भरणा याच मतदार संघात आहे.  खरतर येथील मतदार झोपलेला पाहूनच येथील मतदार संघात भावी उमेदवारांची गर्दी होत आहे. निवडून आल्यानंतर हेच आमदार "आपणा काम बनता, भाड मे जाये जनता.. असे वागत असतात हे  सुज्ञ मतदार बांधवांना ही माहित आहे. त्याचप्रमाणे हे स्वयंघोषित भावी आमदार कितीही बॅनर झळकावले तरी, जनता सब जानती है..

    Post Views:  128


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व