ईस्टाग्राम वर अश्लील छायाचित्र पाठवून अल्पवयीन मुलीला मारहाण
तिघा विरुद्ध गुन्हा दाखल
अकोला: अल्पवयीन मुलीला इंस्टाग्राम वर अश्लील छायाचित्र पाठवून त्यानंतर तिचा पाठलाग करून छळ काढणाऱ्या युवकाला हटकले असता मुलीच्या आईला सुद्धा मारहाण करून जखमी करणाऱ्या तिघांविरुद्ध चान्नी पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
हकीकत अशी की, एका अल्पवयीन मुली सोबत इंस्टाग्रामवर ओळख करून घेऊन एका युवकाने तिला फोटो व अश्लील व्हिडिओ पाठविला त्यानंतर सदर अल्पवयीन मुलगी मावशीकडे ग्राम आलेगाव येथे आली असता मोहम्मद जुनेद मोहम्मद आरिफ रा. आलेगाव यांनी सदर मुलीचा पाठलाग केला. सदर मुलीच्या आईने त्या ठिकाणी येऊन मोहम्मद आरिफ मोहम्मद फारुख , मोहम्मद जावेद मोहम्मद फारुख
समोर चॅटिंग पुन्हा करून असे समजावून सांगितले उलट फिर्यादी सोबत त्यांनी वाद केला व पीडित मुलीचा मोहम्मद जुनेद मोहम्मद आरिफ याने वाईट उद्देशाने हात पकडला तसेच फिर्यादी महिलेला इतर दोघांनी पकडून लाथाबुक्क्यानी मारहाण करून अश्लील शिवीगाळ केली व जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी चान्नी पोलिसांनी भादवीचे कलम ४५२,३५४,३५४(अ)३५४(ड)२९४,३२३,५०६,३४- सहकलम ८,१२पोक्सो अधि प्रमाणे गुन्हा दाखल केला आणि तपासात उपनिरीक्षक कोहळे यांच्याकडे देण्यात आला आहे.
Post Views: 282