भूगोल प्रज्ञाशोध व निबंध स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ


 विश्वप्रभात  2025-04-24
   

पुणे भूगोल शिक्षक संघातर्फे इयत्ता सातवी व इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या भूगोल प्रज्ञाशोध परीक्षा आणि निबंध स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ प्रा.डॉ.श्रीराम पानझाडे सहसंचालक शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते करण्यात आला. स्पर्धेत प्रथम, द्वितीय,तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात गौरविण्यात आले. प्रा.डॉ.श्रीराम पानझाडे म्हणाले, प्रज्ञाशोध परीक्षा, निबंध स्पर्धा यासारख्या उपक्रमांमध्ये अधिकाधिक विद्यार्थ्यांनी - शिक्षकांनी सहभागी व्हावे.मुलांपेक्षा मुलींची संख्या बक्षीस मिळविण्यामध्ये अधिक आहे. मुलींचे विशेषता त्यांनी कौतुक केले. भूगोल संघाच्या उपक्रमाचे कौतुक केले व संघाला त्यांनी शुभेच्छा दिल्या. 
पुणे भूगोल शिक्षक संघाच्या अध्यक्षा अलका काळे, उपाध्यक्षा संध्या माने, कार्यवाह विष्णू मोरे, सुवर्णलता काळे, विनोद वाघ, सुचिता खुणे, कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका माया कोथळीकर, सारिका घारे- जगताप, पाटील उपस्थित होते. भूगोल प्रज्ञाशोध परीक्षा (इयत्ता नववी) प्रथम क्रमांक- कृपा मारणे {अहिल्यादेवी हायस्कूल}  द्वितीय क्रमांक - समृद्धी नाईक {महिलाश्रम हायस्कूल}  तृतीय क्रमांक( विभागून )-
शर्वरी गायकवाड {सुंदरबाई मराठे विद्यालय खराडी} रुद्र वाघमारे { चिंतामणी माध्यमिक विद्यालय आंबेगाव}  भूगोल प्रज्ञाशोध परीक्षा (इयत्ता सातवी)  प्रथम क्रमांक- आकांक्षा मस्के {रेणुका स्वरूप हायस्कूल}
द्वितीय क्रमांक सौंदर्या दुधाम {रेणुका स्वरूप हायस्कूल} तृतीय क्रमांक (विभागून)  जेबा शेख {संत तुकाराम माध्यमिक विद्यालय}  मनस्वी गायकवाड {संत तुकाराम माध्यमिक विद्यालय}  विशेष पारितोषिक ०८ विद्यार्थ्यांना देण्यात आले.  विद्यार्थी निबंध स्पर्धा प्रथम क्रमांक- अक्षरा येरगुंटला (नववी) - {महिलाश्रम हायस्कूल}  द्वितीय क्रमांक रेवती पुटागे-  (दहावी)- युनिक इंग्लिश मीडियम स्कूल  तृतीय क्रमांक- भक्ती मुंडे - { गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल } शिक्षक निबंध स्पर्धा  संजीवनी जगताप {पी.ई.एस.मॉडर्न गर्ल्स हायस्कूल}  द्वितीय क्रमांक- प्रतिभा कडेकर {डॉ. सायरस पूनावला हायस्कूल } गुणवंत भूगोल शिक्षक पुरस्कार सई नेरलेकर एच. एच. सी. पी. हुजूरपागा, लक्ष्मी रोड, पुणे यांना गुणवंत भूगोल शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.  इयत्ता सातवीचा भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेचा निकाल 76.1℅ , तर इयत्ता नववी चा निकाल 80.13% लागला.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद वाघ यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघाच्या अध्यक्षा अलका काळे यांनी तर आभार कार्यवाह विष्णू मोरे यांनी मानले.

    Post Views:  214


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व