कविता जगण्याचे आत्मभान शिकवते - अमोल गोंडचवर


प्रा. वर्षा कावरे लिखित सप्तसूर अंतरीचे या काव्यसंग्रहाचे थाटात प्रकाशन
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  18 Dec 2024, 8:11 AM
   

अकोला - स्थानिक मूर्तिजापूर येथील रहिवासी असलेल्या प्रा. वर्षा कावरे लिखित सप्तसूर अंतरीचे या काव्यसंग्रहाचे प्रकाशन रविवार दिनांक 15 डिसेंबर रोजी चार वाजता मुर्तीजापुर येथील लोटस इंटरनॅशनल स्कूल च्या सांस्कृतिक हॉलमध्ये थाटात संपन्न झाले. त्यावेळी विचार पिठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक  सुरेश पाचकवडे तर उद्घाटक म्हणून युवा लेखक अमोल गोंडचवर होते प्रमुख अतिथी म्हणून डॉ. विनय दादळे डॉ. स्वाती पोटे मीना जवादे श्री विनोद महल्ले प्रा वर्षां कावरे आदी मान्यवरांची विचारपीठावर उपस्थिती होती त्यावेळी बोलताना सुरेश पाचकवडे म्हणाले की. कवयित्री प्राध्यापिका वर्षा कावरे यांच्या कविता  सामाजिक, निसर्ग, भावविभोर, प्रेमविरह, मार्मिक  आदि विषयाला स्पर्शून जाणऱ्या आहेत कावरे यांच्या कविता सामाजिक भान ठेवत यश प्राप्त करणाऱ्या  आहेत. तर उद्घाटक म्हणून बोलताना गोंडचवर म्हणाले की शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या प्राध्यापक वर्षा कावरे यांनी सर्वांग सुंदर आपल्या कवितेतून सर्व विषयाला स्पर्श केला आहे. त्यांच्या कविता वाचनीय आणि वाचक प्रिय आहेत हे विशेष. त्यांच्या कवितेतुन जगण्याचे आत्मभान शिकता येते. असे मत उद्घाटक म्हणून लाभलेले अमोल  गोडचवर यांनी  पुस्तक विमोचन प्रसंगी व्यक्त केले. सुजन साहित्य संघ गझलदीप प्रतिष्ठान साहित्य प्रतिष्ठान, कलाविष्कार साहित्य संघ,  नेहरू युवा मंडळ च्या पदाधिकाऱ्यांसह मूर्तिजापूर येथील  साहित्य सांस्कृतिक पत्रकार बांधवांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र जवादे यांनी तर आभार संदीप महल्ले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशासाठी विलास कावरे संस्कृती कावरे देवयानी कावरे यांनी अथक परिश्रम घेतले.

    Post Views:  13


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व