करुणा,संवेदना नसतील तर तो मनुष्य असू शकत नाही.. डॉ. मोहन भागवत
पुणे हडपसर : खरा तो एकची धर्म ,जगाला प्रेम अर्पावे,ही मुळ साने गुरुजींची प्रेरणा घेउन स्व. डॉ दादा गुजर यांनी हा धागा घट्ट पकडून महाराष्ट्र आरोग्य मंडळाची उभारणी केली.हाच धागा पकडून महाराष्ट्र आरोग्य मंडळाचे सर्व कार्यकर्ते,पदाधिकारी ,विश्वस्थ आत्मियतेने दादांचे कार्य पुढे चालवीत आहेत.धर्म शास्रानुसार करुणा ,संवेदना निर्मान होऊन धर्म कार्ये जागृत होतात.धर्म समाजाची धारणा करतो.करुणा ,संवेदना नसतील तर तो मनुष्य नाही ,असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर संचालक डॉ मोहन भागवत यांनी येथे व्यक्त केले.आयुष मंत्रालय भारत सरकारच्या अनुदानातून महाराष्ट्र आरोग्य मंडळ संचलीत डॉ दादा गुजर माता,बाल संशोधन रुग्णालयाचे उदघाटन त्यांचे हस्ते झाले.डॉ. भागवत आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की चरक संहितेतील प्रतिज्ञा म्हणजे चिकित्सा ही सेवा आहे व तशी सेवा असावी.अन्न,वस्र,निवारा तसेच सन्मानपूर्वक जगणे ह्या मानवाच्या मुलभूत गरजा आहेत.ह्या गरजा पुर्ण करण्यासाठी मनुष्य अहोरात्र आपले कर्म करत असतो.चांगले शिक्षण व आरोग्य याशिवाय ह्या मुलभूत गरजा पूर्ण होऊ शकत नाही.यासाठी शिक्षण व आरोग्य सुलभ व परवडणारे असावे.अन्न,अक्षर ,आरोग्य ,व आचरण महत्वाचे असून आरोग्य रक्षणासाठी इलनेस बरोबर वेलनेस हि महत्वाचा आहे.जगतील सर्व होमेओपथी,आयुर्वेद ,अॕलोपथी सह सर्व चिकित्साप्रणाली एकत्र येउन आरोग्य रक्षण होणे जरुरीचे आहे,असे मत डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र आरोग्य मंडळाचे सचिव अनिल सिताराम गुजर यांनी प्रास्ताविक करुन प्रमुख पाहुण्यांचा सत्कार केला.मंडळाचे अध्यक्ष डॉ एस.एफ .पाटील यांनी मनोगत व्यक्त करुन संस्थेच्या कार्याची माहिती सांगितली.व्यासपीठांवर प्रमुख पाहुणे जेष्ठ उद्योजक बाबासाहेब कल्याणी, कार्यकारी संचालक भारत फोर्ज ,सौ सुनिता कल्याणी पुणे उपस्थित होते .ह्या प्रसंगी पुणे जिल्ह्यातून स्व. दादा गुजर ह्यांचे स्नेहीजन , उरुळीकांचन येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते ,अनेक मान्यवर ,पुरोगामी विद्यालयचे सचिव रंगनाथ अप्पा कड ,जेष्ठ समाज सेवक डॉ रविंद्र भोळे अध्यक्ष डॉ मणी भाई देसाई मानवसेवा ट्रस्ट उरुळीकांचन,डॉ जे .पी देसाई यांचेसह अनेक मान्यवर खास निमंत्रित म्हणून उपस्थित होते.
Post Views: 221