शासकीय दिव्यांग कर्मचाऱ्यांचा अभिनेत्री इरावती लागू करणार सत्कार
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
20 May 2023, 7:02 PM
अकोला : स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या माध्यमाने दि.२८ मे २०२३ रोजी आर .एल. टी विज्ञान महाविद्यालयात संध्याकाळी ५ वाजता होणाऱ्या स्वर काव्य महोत्सवात मुख्य पोस्ट कार्यालयातील दिव्यांग कर्मचारी श्री.दिलीप नालंदे यांचा अभिनेत्री इरावती लागू , संगीतकार कौशल इनामदार , समाज कल्याण अधिकारी डी .एम .पुंड ॲड.मोतीसिंग मोहता यांच्या हस्ते सत्कार केला जाणार आहे . श्री.दिलीप नालंदे हे पोस्टल असिस्टंट या पदावर मुख्य पोस्ट कार्यालय अकोला येथे १२ वर्षापासून कार्यरत आहेत . ते दोन्ही पायांनी दिव्यांग असले तरीही जनतेला अविरत आपली सेवा प्रदान करीत आहेत . संस्थापक अध्यक्ष प्रा.विशाल कोरडे यांनी दिनांक १९ मे २०२३ रोजी मुख्य पोस्ट कार्यालयास भेट देऊन श्री.नालंदे व कार्यालय प्रमुख श्री.अभय कुलट (डी वाय पोस्टमास्टर) यांना सत्कार समारंभाचे आमंत्रण दिले . कार्यालय प्रमुख श्री. अभय कुलट यांनी या अभिनव उपक्रमाबद्दल दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला चे आभार व्यक्त केले. समाजात दिव्यांगांना मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी स्वर काव्य महोत्सवाच्या निमित्ताने प्रा.विशाल कोरडे करत असलेल्या उपक्रमाचे कौतुक त्यांनी केले . रविवार २८ मे २०२३ रोजी होणाऱ्या स्वर काव्य महोत्सवाला आर एल टी विज्ञान महाविद्यालयात येऊन अकोलेकरांनी भरभरून प्रतिसाद द्यावा असे आव्हान त्यांनी केले . ज्या दिव्यांग बांधवांना व्हीलचेयर , ब्रेल बुक्स व शैक्षणिक शिष्यवृत्ती हवी आहे त्यांनी संस्थेच्या हेल्पलाइन क्रमांक ०९४२३६५००९० वर संपर्क साधावा असे आव्हान कोषाध्यक्ष श्री.विजय कोरडे , सौ भारती शेंडे , प्रा.मुकुंद पाध्ये , ब्रिजमोहन चितलांगे व अनामिका देशपांडे यांनी केले .
Post Views: 79