ग्रामीण विकासाचा सेवाभाव जपणारे अंगणवाडी सेविके सह आशा यांचे कार्य महत्त्वाचे


आनंद देशमुख महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान करून राष्ट्रीय सुशासन दिवस साजरा
 विश्वप्रभात  30 Dec 2025, 6:41 PM
   

अकोला : देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मजयंती शताब्दी वर्षाचे औचित्य साधून आयोजित राष्ट्रीय सुशासन दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 
अकोला पूर्व चे लोकप्रिय आमदार श्री रणधिर भाऊ सावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली, खासदार श्री.अनुपदादा धोत्रे यांच्या संकल्पनेनुसार ,भाजपा अकोला जिल्हा अध्यक्ष मा. श्री. संतोषजी शिवरकर यांच्या नेतृत्वात व श्री आनंद शिवाजीराव देशमुख यांच्या प्रयत्नातून यावेळी आरोग्य सेविका,आशा सेविका,अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. शिवाय कावसा सार्वजनिक आरोग्य सेवा केंद्रा च्या उभारणी साठी जमीनदान देऊन मोलाचे योगदान दिल्या बद्दल श्री . सुनिल भाऊ गोरले व श्री संजुशेठ चिंचोलकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भाजपाचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक श्री. जयदेवराव साबळे तर  प्रमुख उपस्थिती म्हणून अकोला  भाजपा चे सरचिटणीस मा. श्री. राजेशजी नागमते अकोला जि. प. चे माजी अध्यक्ष श्री शिवाजीराव देशमुख, अकोला जि. प. चे माजी समाज कल्याण सभापती श्री. विजयसिंह सोळंके, अकोट पं. स. समितीचे माजी सदस्य श्री रितेश भाऊ तायडे व प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा चोहटा बाजार मंडळ अध्यक्ष श्री विठ्ठलराव वाकोड, भाजपा चोहटा बाजार युवामंडळ मोर्चा अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर झामरे, श्री प्रवीण डेक्कर, श्री अशोकराव झामरे, श्री दत्तू पाटील झामरे  उपस्थित होते. 
देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी सर्वांना सोबत घेत राष्ट्र आणि पक्ष निर्मितीचे काम केले असे मत श्री राजूभाऊ नागमते यांनी व्यक्त केले तर तळागाळापर्यंत काम करणाऱ्या आशा सेविका, अंगणवाडी सेविका/ मदतनीस,आरोग्य सेविका ह्या खऱ्या अर्थाने आपल्या आरोग्य सेवेचा पाया आहेत असे मत श्री.शिवाजीराव देशमुख यांनी व्यक्त केले या कार्यक्रमा मध्ये अनेक आशा,अंगणवाडी,आरोग्य सेविका भावनिक झाल्या व हा त्यांच्या कार्याचा यथोचित सन्मान झाल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री गजानन थोरात, श्री सतीश सावरकर, श्री गजानन कवटकार,श्री गोपालभाऊ सदाफळे, श्री गजानन गावंडे, श्री प्रतीक सपकाळ, श्री मुरलीधर उमाळे, श्री विनोद साबळे, श्री स्वप्निल बुटे, श्री सुनील गोरले ,श्री सतीष जायले व भाजपाचे सर्व बूथ प्रमुख यांनी मोलाचे योगदान दिले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन श्री अशोक भाऊ झामरे यांनी केले.

    Post Views:  13


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व