दुय्यम निबंधक पालघर -२ (बोईसर)चे श्री. सुधाकर मोरे यांचा विशेष गौरव सन्मान


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  22 Apr 2022, 12:34 PM
   

बोईसर -(संतोष घरत) : दुय्यम निबंधक कार्यालय श्रेणी- १ पालघर-२( बोईसर) चे दुय्यम निबंधक श्री .सुधाकर मोरे यांनी केलेल्या उत्कृष्ट  कामगिरीबद्दल महाराष्ट्र शासनाने त्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

एप्रिल २०२१-२२ वर्षासाठी दुय्यम निबंधक पालघर -२ चे सब  रजिस्टार श्री. सुधाकर मोरे यांनी महाराष्ट्र शासनाने निर्धारित केलेले इष्टांक ७५ कोटी रुपये इतके असताना  अहवाल सालात ८८.३३% कोटी रुपये (११९%) स्टॅम्प ड्युटी द्वारे महसूल जमा करून एक नवीन रेकॉर्ड (व्याख्या)संपादित केला आहे. जानेवारी२०२२ ते मार्च२०२२ या दरम्यान सरवर डाऊन असताना व पंतप्रधान आवास योजना चा कालावधी ३१ मार्च ला संपुष्टात येत असल्याने जनतेला त्याचा फायदा (लाभ)  व्हावा व शासनाच्या तिजोरीत मुद्रांक जास्तीत जास्त जमा व्हावा. हा मनात उद्देश ठेवून कार्यालयाची वेळ संपली असताना सुद्धा जास्त वेळ काम करून जनतेचा व शासनाचा कसा फायदा होईल हे लक्ष्यात ठेऊन त्यांनी अहो रात्र परिश्रम घेऊन काम केले, ह्या त्यांच्या कार्याला सर्व स्थरा वरून व जनतेकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.                         दुय्यम निबंधक पालघर क्र.१ यांना शासनाने दिलेल्या १०५ कोटी रूपये इष्टांकच्या बदल्यात ६८ कोटी रुपये (६४.७६%) इतर महसूल स्टॅम्प ड्युटी द्वारे जमा झाले .त्या तुलनेने दुय्यम निबंधक पालघर -२ (बोईसर) चे सब रजिस्टार श्री. सुधाकर मोरे यांनी महाराष्ट्र शासनाला अधिकतम महसूल जमा करून दिल्याने महसूल मुद्रांक शुल्क व नोंदणी विभागातर्फे मुद्रांक जिल्हाधिकारी माननीय श्री .उदयराज चव्हाण यांनी प्रशस्तीपत्रक देऊन श्री. सुधाकर मोरे यांना गौरविण्यात आले .ह्यामुळे सुधाकर मोरे व त्यांच्यासोबत काम करणारे  कर्मचाऱ्यांचे मान्यवरांच्या वतीने सर्व ठिकाणी अभिनंदन करण्यात येत आहे. असेच कर्तव्यदक्ष रजिस्टार सर्व ठिकाणी असल्यास शासनाचा फायदाच होईल. असे  सर्व स्थरावर बोलले जात आहे.

    Post Views:  461


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व