पद्मश्री सिंधूताई सपकाळ ह्या अनाथांच्या भल्यासाठी निरंतर कार्यरत राहणाऱ्या कर्मयोगी होत्या : जेष्ठ समाजसेवक डॉ.रविंद्र भोळे


 संजय देशमुख  06 Jan 2022, 11:46 AM
   

उरुळीकांचन : विदर्भ रत्न पद्मश्री सिंधूताई सपकाळ ह्यांना जीवनात अनेक कटू अनुभवाला समोरे जावे लागले .त्या अनुभवाच्या बळावर त्यांनी  निराधार बालकांचे व अनाथांचे पुनर्वसनासाठी समाजातील दातृत्ववान व्यक्तीकडून मदत घेऊन अनाथांची सेवा केली.पुरंदर येथील ममता बालसदन येथे पिंपरी चिंचवड सुवर्ण समितीचा कार्यक्रम माझ्या वतीने आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्याना अर्धिक मदत मिळवून दिली. तसेच महात्मा गांधी विद्यालयात अर्धिक मदतीसाठी कार्यक्रमाचे आयोजन करून माईंना निमंत्रित करून आर्थिक मदत देण्यात आली. माई आमच्या घरी येउन गेल्या तेव्हा त्यांनी येथे विदर्भ खांन्देश येथील अनेक प्रेमळ महनुभाव भेटले. त्यात सामाजिक कार्यकर्ते व प्रवचनकार डॉ रविंद्र भोळे ह्यांची भर पडली असा आवर्जुन उल्लेख केला. पुरंदर येथे ग्रामीण भागात वैद्यकिय सेवा देत असतांना अनेक वेळा माईंना भेटत होतो.सिंधूताई सपकाळ ह्यांनी निराधार अनाथ बालकांसाठी  केलेल कार्य उल्लेखनीय होते. पद्मश्री सिंधूताई सपकाळ ह्या अनाथांच्या सर्वांगीण भल्यासाठी निरंतर कार्यरत राहऱ्या अनाथांची माई होत्या. असे मत जेष्ठ समाज सेवक, प्रवचनकार, अपंगसेवक डॉ. रविंद्र भोळे ह्यांनी येथे व्यक्त केले. स्व सिंधूताई सपकाळ ह्यांना  श्रध्दांजली अर्पण करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन डॉ रविंद्र भोळे अआरोग्यसेवा केंद्र,व डॉ. मणिभाई देसाई मानव सेवा ट्रस्ट निती आयोग दिल्ली  संलग्नित संस्थेच्या वतीने करण्यात आले होते. ह्या वेळी  मत डॉ रविंद्र भोळे बोलत होते. ह्या कार्यक्रमाला अनेक कार्यकर्ते उपस्थीत होते.

    Post Views:  244


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व