निंबा गावाच्या इतिहासात पहिल्यांदाच जि.प. मराठी केंद्रीय शाळा निंबा येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने दहीहंडी कार्यक्रम
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
09 Sep 2023, 7:49 PM
(लुकमान शहा) निंबा : जिल्हा परिषद मराठी केंद्र शाळा निंबा येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने दहीहंडी कार्यक्रम उसात साजरा करण्यात आला. इयत्ता पहिली ते पाचवी विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला. इयत्ता पहिली ते पाचवी मुला मुलींचे संघाने ही दहीहंडी फोडण्यात यश मिळवले. इतिहासात पहिल्यांदाच जि. प.केंद्र शाळा निंबा येथे हा उत्साह गावकरी व विद्यार्थ्यांना अनुभवास मिळाला.
यावेळी चिमुकल्यामध्ये भरपूर उत्साहात पाहण्यात आला. विजेत्या चमूला मुख्याध्यापक राजेश तायडे सर,नागेश सोळंके सर, खेडकर सर,कांबळे सर यांनी परिश्रम घेतले व सुनिल तायडे(शाळा समिती अध्यक्ष ), किशोर बोदडे सामाजिक कारकर्ते व शाळा समिती सदस्य, गणेश देशमुख ग्रा.पं.सदस्य धम्मपाल तायडे,पत्रकार लूकमान शहा गावकरी मंडळी च्या उपस्थित उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रम पार पाडण्यात आला.
Post Views: 204