अभिजित दादा फाळके यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ग्राम संवाद बैठक व श्रीकांत पाटील यांची वर्धा तालुका उपाध्यक्ष पदी नियुक्ती


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  2022-04-22
   

वर्धा (किशोर मुटे) : १८ एप्रिल २०२२ रोज सोमवार ला वर्धा तालुक्यातील भूगाव येथे प्रदेश संघटक सचिव अभिजित दादा फाळके यांच्या नेतृत्वात संवाद बैठक पार पडली. बैठकीचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सहकारी श्रीकांत पाटील यांनी केले होते. बैठकीला गावातील लोकांना उपस्थितीती देत त्यांना भेडसावत असलेल्या समस्या बद्दल सांगितले यात प्रामुख्याने भूगाव येथील स्थानिक युवकांना पॉवर प्लांट मध्ये रोजगार देणे, कंपनी मुळे वातावरण मोठ्या प्रमाणात दूषित होत असून याचा परिणाम गावातील नागरिकांच्या आरोग्यावर मोठ्या होत असून आजारामुळे गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे  प्रदूषणामुळे शेती वर खूप मोठ्या प्रमाणात परिणाम झालं असून शेतकऱ्यांचे उत्पन्न ५० टक्क्यांनी घटले असल्याचे सांगितले. तसेच कंपनी मध्ये वाहतूक करणाऱ्या मोठ मोठ्या वाहनांमुळे रस्त्याची दुरवस्था झालेली असून प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास आणून दिले व कंपनी मार्फत गावात कुठल्याही प्रकारचे वृक्ष लागवड अथवा गाव विकासासाठी देत असलेल्या CSR फंडाचा कोणताही लाभ गावाला मिळत नसल्याची तक्रार उपस्थित ग्रामस्थांनी केली. प्रदेश संघटक सचिव अभिजित दादा फाळके यांनी ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेत संबंधित अधिकारी यांना कळवून जातीने लक्ष घालून समस्या निवारणासाठी प्रामाणिक प्रयत्न करतो असे आश्वासित केले. 
                     बैठकीला मार्गदर्शन करते वेळी येथील युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न हा त्यांचा पोटाचा प्रश्न असून यासाठी त्यांनी स्वतः लढा उभारून संघर्ष करण्याची तयारी ठेवा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आपल्या पाठीशी ठाम पणे उभा आहे असे सांगितले व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आपल्याला कसा मजबूत करता येईल यावर मार्गदर्शन केले.सोबतच  वर्धा तालुका अध्यक्ष राजदीप वाघमारे यांच्या मान्यतेने अभिजित दादा फाळके यांच्या मार्फत श्रीकांत पाटील यांची वर्धा तालुका उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस या पदावर नियुक्ती करण्यात आली.यावेळी बैठकीला राजूभाऊ वाघमारे, प्रदेश सचिव सामाजिक व न्याय, प्रदीप भाऊ वानखेडे, कार्याध्यक्ष सामाजिक व न्याय, रा.यू.का. उपाध्यक्ष प्रा प्रविण काटकर, भूमिपुत्र संघर्ष वाहिनी जिल्हाध्यक्ष योगेश घोगरे, प्रा.नावेद शेख,सचिन घोडे,अतुल पाळेकर, योगेश चिंचोलकर,दिलीप थूल, लकी उर्कुडे, अंकुश चाहांदे, किशोर लोखंडे, अक्ष्य खैरकर, रजत नाखले, धीरज थूल, सुगत थूल, राकेश उरकुडे, आकाश ताकसांडे, मोहन उईके,प्रविण काळे, विकास ताकसांडे, अविनाश शास्त्रकर,प्रविण हेमने, चैतन्य थूल, आशिष थूल, सनी उरकुडे, संजय कांबळे व गावातील नागरिक उपस्थित होते.

    Post Views:  169


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व

अत्त दीप भव

४२ मिनेट