प्रकाश पोहरे दुसऱ्यांदा इलनाच्या अध्यक्षपदी; एकमताने झाली निवड


देश्यातील स्वातंत्र्यपूर्व काळातील सर्वात जुनी संघटना
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  22 Nov 2025, 2:18 PM
   

नवी दिल्ली : इंडियन लँगवेजेस न्यूजपेपर्स असोसिएशन, (ILNA) इलनाची ८१ वी वार्षिक आमसभा देशातील वृत्तपत्र मालक संपादकांच्या उपस्थितीमधे  दिल्लीतील नविन महाराष्ट्र सदन येथे इलनाचे माजी अध्यक्ष  तथा सोशल मिडिया असो. (SMA) चे राष्ट्रीय अध्यक्ष  सुनील डांग, यांच्या अध्यक्षतेखाली  सुरू झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सर्वप्रथम उत्पन्न-व्यय अहवाल व अजेंड्यावरील सर्व विषयाला देशभरातील अनेक राज्यातील उपस्थित सदस्यांनी  एकमताने मान्यता दिली.
भारतीय भाषिक वृत्तपत्र संघटना, इलना (ILNA) ही भारतातील प्रादेशिक आणि स्थानिक वृत्तपत्रे बळकट करण्याच्या उद्देशाने १९४० साली महाराष्ट्रात स्थापन झालेली संस्था आहे. सभे समोरील सर्व विषय संपल्यावर  निवृत्तीमुळे रिक्त झालेल्या ७ कार्यकारणी सदस्यांच्या रिक्त जागेवर  नियमानुसार निवडणुकीची घोषणा करण्यात आली. सुनील डांग यांनाच निवडणूक अधिकारी म्हणून काम करण्याची विनंती करण्यात आली.  त्यांनी रीतसर निवडणूक प्रक्रिया सुरु केल्यानंतर ७सदस्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली, ज्या मधे प्रकाश पोहरे, रवी बिष्णोई, अंकित बिष्णोई, देवेन्द्रसिंग तोमर, ललित भारद्वाज, अर्जुन चोपडा, संजय गुप्ता यांचा समावेश आहे. 
      नंतर झालेल्या कार्यकारणीच्या बैठकीत विदर्भ पब्लिकेशन ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक तथा दैनिक देशोन्नती, दैनिक राष्ट्रप्रकाश व साप्ताहिक कृषकोन्नतीचे संपादक प्रकाश पोहरे यांना सलग दुसऱ्यांदा देशातील सर्वात मोठ्या भाषिक वृत्तपत्रांच्या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून एकमुखाने घोषित केल्या गेले आणि त्यांना त्यांचे सहकारी निवडण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले तेव्हा पोहरे ह्यांनी अर्जुन चोपड़ा, पंजाब केसरी, तथा डॉ संजय गुप्ता दिल्ली, हे दोन उपाध्यक्ष, पुरुषोत्तम गावंडे, महाराष्ट्र, अंकित बिश्नोई, मेरठ, (उप्र) सुधीर पांडा, भुवनेश्वर (उड़ीसा) हे तीन महासचिव, तर बाळकृष्ण आंबेकर, महाराष्ट्र ह्यांना कोष्याधक्ष म्हणून घोषित केले. 
      इलना कार्यकारणी सदस्य म्हणून देवेन्द्रसिंग तोमर, दिल्ली, रणदीप घनगस, पानिपत, डी.डी. मित्तल, देहरादून, बसवराज गोविंदगोपाल, बागलकोट, शिव अग्रवाल, नागपूर, गिरीश चंद्र शर्मा, फरीदाबाद, नागप्पा करंनेवार, धारवाड,  अभिषेक वर्मा, भोपाल, सरोजिनी अराजे, कर्नाटक, यशपाल सिंह, मेरठ, चेतन भैरम, भंडारा, संदीप गुप्ता, दिल्ली रवि बिश्नोई, मेरठ,  ललित भारद्वाज, मेरठ हे कार्य करणार आहेत. 
           प्रकाश पोहरे ह्यांनी त्यांच्या अधिकारात सात कार्यकारी सदस्य मनोनीत केले ज्या मधे, राममोहन रघुवंशी, भोपाल(मप्र), कृष्णा शेवडीकर, नांदेड(महा) प्रकाश कुलथे, शिरडी, (महा) अशोक कौशिक दिल्ली, अशोक नवरत्न, लखनव, शरद वानखेड़े, अकोला (महा), सुरेश बाबू (केरळ), सुरेंद्रकुमार शर्मा, दिल्ली हे सामील आहेत. त्यानंतर प्रकाश पोहरे ह्यांनी संघटनही शक्ती है अशी घोषणा देत इलनाची सदस्य संख्या वाढविण्याच्या उद्देश्याने उत्तर प्रदेश,डॉ. ललित भारद्वाज, केरल,पीजी सुरेश बाबू, दिल्ली, विशाल रावत, एनसिआर, अशोक कौशिक, लखनऊ अशोक नवरतन, हे ५ प्रदेशाध्यक्ष घोषित करून त्यांच्या कडून सदस्य संख्या वाढविण्याचे अभिवचन घेतल्या गेले.
       या बैठकी नंतर प्रकाश पोहरे यांनी इलनाचे पूर्व अध्यक्ष सुनील डांग आणि भूषण जैन (पंजाब केसरी) यांना  येणाऱ्या प्रत्येक कार्यकारणी बैठकीचे वरिष्ठ मार्गदर्शक म्हणून घोषित केले. आमसभा व निवडणूक पार पडल्यानंतर विशेष अतिथी म्हणून निमंत्रित केलेले केन्द्रीय आयुष मंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव यांचे आगमन झाले. त्यांनी त्यांच्या सारगर्भित भाषणात संस्थेला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आणि राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश पोहरे ह्यांच्या प्रामाणिक व पारदर्शी कारभाराची आणि शेतकऱ्यांप्रति त्यांच्या समर्पनाची मुक्तकंठाने प्रशंसा केली.
      इलनाचे पूर्व उपाध्यक्ष तथा सन्मार्ग मीडिया समूहाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक विवेक गुप्ता हे आयएनएसचे अध्यक्ष म्हणून निवडून आल्याबद्दल इलना सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले. इलना अध्यक्ष पोहरेंनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. गुप्ता ह्यांनी त्यांच्या भाषणात आरएनआय आणि डीएव्हीपीने नव्यानेच केलेल्या नियमांमुळे प्रकाशकांना येणाऱ्या विविध अडचणी सोडविण्यासाठी इलना आणि आयएनएस समन्वयाने कार्य करण्याचे आश्वाषित केले. अनेक मंत्री आणि केंद्र तसेच महाराष्ट्र सरकारच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी  पोहरे यांना शुभेच्छा दिल्या. भोजन आणि निवासाची उत्तम सोय केल्याबद्दल इलना सदस्यांनी समाधान व्यक्त केले. कार्यकारणीची पुढील सभा जानेवारीमधे भुवणेश्वर येथे घेण्याचे निश्चित करण्यात आले. आमसभेला विविध राज्यांमधील इलनाचे अनेक सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. भोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

    Post Views:  73


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व