शिवसेना बोईसर शहर शाखेकडून हनुमान जन्मोत्सव


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  16 Apr 2022, 8:00 PM
   

बोईसर - ( संतोष घरत ) आज शिवसेना बोईसर शहरा तर्फे बोईसर शहारा मध्ये हनुमान जयंती निमित्त राममंदिर नवापूर नाका, बोईसर ह्या ठिकाणी हनुमान चालीसा व महाआरती मोठ्या उत्सवामध्ये साजरी करण्यात आली. ह्यावेळी  शिवसेना विधानसभा संघटक व हिंद भारतीय जनरल कामगार सेना तालुका अध्यक्ष, शिव सम्राट ऑटो  रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटना बोईसर संस्थापक मा. श्री . निलम संखे , शिवसेना विभाग प्रमुख श्री.राजेश करवीर, संघटनेचे व रिक्षा युनियनचे पदाधिकारी, शिवसैनिक, युवसैनिक व हनुमान भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहून, जय श्री राम, व जय हनुमान च्या घोषणा देऊन हा हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्सवामध्ये  साजरा करण्यात आला.

    Post Views:  1145


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व