ऍड.सदावर्ते पती,पत्नीचा अटकपूर्व जामिनासाठी अकोट न्यायालयात अर्ज दाखल


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  19 Apr 2022, 9:29 PM
   

अकोट -रापम कर्मचारी आर्थिक फसवणूक प्रकरणी वकिल गुणरत्ने सदावर्ते व त्यांची पत्नी वकील जयश्री पाटील यांना अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी आकोट जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला आहे. अकोला येथिल विख्यात विधीज्ञ मून्ना खान, आकोट येथिल विधिज्ञ श्रीरंग तट्टे व मुंबई येथुन आलेली विधीज्ञ शिल्पा टिळक यानी हा अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधिश चकोर बाविस्कर यांचे समक्ष दाखल केला. ह्या अर्जाची नोटीस सरकार पक्षातर्फे स्विकारण्यात आली असुन त्यावर सरकार पक्ष ऊद्या से दाखल करणार असल्याचे कळते. ह्या से नंतर या प्रकरणी त्याच दिवशी सुनावणी होणार आहे. या सुनावणीतून कोणता आदेश बाहेर येतो ह्याबाबत सर्वत्र कमालीची ऊत्सुकता निर्माण झाली आहे.

आकोट न्यायालयात ह्या घडामोडी घडत असताना न्यायालयाबाहेर मात्र सर्वत्र वेगळीच चर्चा जोर धरीत होती. गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील ह्या हा जामीन अर्ज दाखल करण्यासाठी आकोटात आल्याचे सर्वत्र ऐकू येत होते.

यात सोशल मिडीयानेही मोलाची भर घातली. ही खबरा शहरात पसरताच अनेक हौशानी आणि एसटी कर्मचा-यानी न्यायालयात जावून ह्याची खातरजमा करण्याचाही प्रयास केला. ईतकेच नाही तर या वार्तेने पोलीस प्रशासनही दक्ष झाले. ही महिला खरेच जयश्री पाटील आहे का याची त्यानीही पडताळणी केली. अखेर जुजबी चौकशीनंतर त्या मुंबईकर महिलेचा खुलासा झाला. ती महिला विधीज्ञ असुन ती गुणरत्न सदावर्ते यांची मदतनिस म्हणून काम करीत असल्याचे तिचे म्हणणे आहे. तिचे नाव शिल्पा टिळक आहे. ती मुबई ऊच्च न्यायालयात वकिली करित असल्याचे तिने सांगितले. गुणरत्न सदावर्ते यांचे स्नेही फैजल शेख याचेसोबत ही शिल्पा आकोट शहरात आली आहे.

त्यांचा मुक्काम आकोट येथिल शासकिय विश्रामगृहावर असुन ते दोघेही सदावर्ते व त्यांच्या पत्नीच्या जामिनासाठी खटपट करित आसल्याचे शिल्पा टिळकचे म्हणणे आहे. ह्याच शिल्पा टिळकला आकोटवासी गुणरत्न सदावर्ते यांची पत्नी समजले. आणि शहरातील वातावरण बराच काळ चांगलेच ढवळून निघाले. यावरुन सदावर्ते याना आकोटात आणल्यास त्याना बघण्यासाठी तोबा गर्दी होऊन त्याने पोलीस प्रशासनाला चांगलीच कसरत करावी लागणार असा अंदाज आहे.

    Post Views:  338


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व