जेष्ठ समाजसेवक डॉ रविंद्र भोळे महाराज ह्यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार प्रदान


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  17 Jan 2024, 8:12 PM
   

समर्पित भावनेने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले पद्मश्री डॉ. मणीभाई देसाई मानव सेवा ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डॉ. रवींद्र भोळे यांना नुकताच आदर्श समाजसेवक पुरस्कार  प्राप्त झालेला आहे. स्मृतिचिन्ह सन्मानपत्र व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ज्येष्ठ समाजसेवक, प्रवचनकार, अपंग सेवक,  डॉ. रवींद्र भोळे महाराज यांना हा पुरस्कार सरदार वल्लभ भाई पटेल सभागृह येथे प्रदान करण्यात आला. याप्रसंगी सिताराम राणे अध्यक्ष समता भातृ मंडळ, निना भाऊ खर्चे अध्यक्ष पिंपरी चिंचवड लेवा संघ, डॉ. रवींद्र चौधरी चेअरमन एलसीसीआय, डॉ. दिनेश नेहते, डॉ.मिलिंद चौधरी अध्यक्ष जळगाव जिल्हा लेवा मंडळ, नितीन बोंडे शिवसेना विभाग प्रमुख, विकास वारके भ्रात्रूमंडळ पिंपळे सौदागर, पुरुषोत्तम पिंपळे सल्लागार लेवा भ्रात्रू मंडळ, डॉ रेखा भोळे,  यांचे सन्माननीय उपस्थितीत वरील पुरस्कार समताभातृ मंडळाचे अध्यक्ष सितारामजी राणे ह्यांचे हस्ते आदर्श समाजसेवक पुरस्कार डॉ. रवींद्र भोळे यांना प्रदान करण्यात आला. याप्रसंगी आपले मत व्यक्त करताना समताभ्रातृ मंडळाचे सचिव रवींद्र बराटे म्हणाले की ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे यांना भारत सरकारच्या वतीने देण्यात येणारा सामाजिक कार्याबद्दल चा पद्मश्री पुरस्कार मिळावा अशी सर्व मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी यांच्यावतीने इच्छा व्यक्त करीत आहे. डॉ. रवींद्र भोळे हे प्रवचनकार कीर्तनकार आहेत त्यांनी अध्यात्मिक ,योगाप्रणायम सामाजिक, राष्ट्रीय एकात्मता वैद्यकीय ,शैक्षणिक ,अपंग सेवा मराठवाडा भूकंप, नैसर्गिक आपत्ती, कार्य कोरोना पेंडेमिक वर्क केलेलें असून  व पुरंदरच्या दुष्काळग्रस्त भागांमध्ये कार्य केलेले आहे. तसेच त्यांनी कार्यकर्त्यांना स्फूर्ती देण्याचे कार्यही केलेले आहे. सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्ररत्न पुरस्कार, मनीभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार यासारखे पुरस्कार देऊन त्यांनी कार्यकर्त्यांचे कौतुक केले आहे. याप्रसंगी डॉक्टरेट इन बिझनेस मॅनेजमेंट लाईफ अचीवमेंट अवॉर्ड मिळाल्याबद्दल डॉ .निनाद वायकोळे यांनाही सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे म्हणाले की समता भ्रा तृ मंडळाच्या वतीने देण्यात  आलेला हा आदर्श समाजसेवक पुरस्कार मला जीवनभर प्रेरणा देईल. हा पुरस्कार पुणे जिल्ह्यातील सर्व मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष ,सचिव ,व मुख्य कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत देण्यात येत आहे, हा माझा खूप मोठा बहुमान आहे. या पुरस्कारामुळे नवनिर्मिती करण्याचा एक संकल्प आहे. मी संस्थेचा ऋणी आहे. याप्रसंगी आपल्या भाषणात  सिताराम राणे म्हणाले की पुरस्कारामुळे कार्यकर्त्यांच्या पाठीवर थाप पडते, व त्यामुळे कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळते, व प्रेरणेमुळेच कार्य करण्याची ऊर्जा निर्माण होते. ह्या सर्व कार्यक्रमाचे नियोजनबद्ध आखीव रेखीव सूत्रसंचालन रवींद्र बराटे यांनी केले. कार्यक्रमाला डॉ. एल झेड पाटील, कृष्णा खडसे , किरण चौधरी, यांचे सह माझी आजी सभासद सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
      ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार अपंग सेवक ह भ प डॉ.रवींद्र भोळे महाराज आदर्श समाजसेवक पुरस्काराने सन्मानित, डॉ.रवींद्र भोळे  यांना पद्मश्री पुरस्कार मिळावा अशी कार्यकर्त्यांची तीव्र इच्छा.डॉ निनाद वायकोळे यांनाडॉक्टरेट इन बिजनेस मॅनेजमेंट ऑनर मिळाल्याबद्दल जाहीर सन्मान झाला. डॉ. रेखा भोळे यांचे झाला सत्कार.

    Post Views:  134


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व