देगलूर येथे कॉम्रेड डॉ अण्णा भाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी


 विश्व प्रभात  03 Aug 2024, 7:39 PM
   

देगलूर --- कॉम्रेड डॉ अण्णा भाऊ साठे यांची १०४ वी जयंती साजरी करण्यात आली व ध्वजारोहण आमदार जितेश अंतापूरकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहूणे म्हणून नगरपालिकेचे  मुख्याधिकारी तानाजी चव्हाण ,देगलूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार झुंजारे, मा‌.शिवाजी देशमुख उपस्थित होते.
 याप्रसंगी बळेगावकर,मोगलाजी शिरशेटवार,शंकर कंतेवार ,निवृती कांबळे , चंद्रकांत घाटे ,धोंडीबा कांबळे, अविनाश निलमवार ,सरिफमामू ,यांची प्रमुख उपस्थिती होती.चव्हाण साहेब यांच्या अध्यक्षीय व समारोपीय भाषण झाले. आमदार जितेश अंतापूरकर यांनी क्रॉम्रेड अण्णाभाऊंच्या जीवनचरित्राची माहिती आपल्या भाषणातून दिली.लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष मा.ॲड एन जी सुर्यवंशी यांनी समाजाच्या अबकड आरक्षण वर्गीकरणाचा विषय समजून सांगितला.मुख्याधिकारी  चव्हाणसाहेब यांच्या अध्यक्षिय भाषणाने कार्यक्रमाचा समारोप झाला.
     या कार्यक्रमाचे आयोजन कॉम्रेड ईश्वर तलवारे नांदेड जिल्हाध्यक्ष लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ यांनी केले होते. आभार प्रदर्शन शंकराव भाटापूरकर यांनी  केले .

    Post Views:  24


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व