अकोला येथील पत्रकार श्री. शंकर जोगी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ जिल्हा परभणीच्या वतीने निषेध


पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्याची जिल्हाधिकारी यांना मागणी
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  27 Aug 2024, 11:56 AM
   

परभणी : अकोला येथील पत्रकार व एका पत्रकार संघटनेचे पदाधिकारी श्री शंकर जोगी यांचेवर अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर येथील टोल नाक्यावरील मग्रूर टोल कर्मचाऱ्यांनी जबर प्राणघातक हल्ला केला.६० कि‌.मी.च्या प्रवासाला टोल माफी असतांना त्यांचेकडून बळजबरीने  टोल टॅक्स घेण्याच्या किरकोळ कारणावरून दादागीरी करून टोल कर्मचाऱ्यांनी एकत्रीत येऊन झुंडशाहीने त्यांना मारहाण केली.
       लोकशाहीत देशातील चौथा आधारस्तंभ असणाऱ्या पत्रकारांना मारहाण करणे हा अत्यंत मोठा गुन्हा पत्रकार हा संघटीत आहे हे अशा टारगट माथेफिरूंनी कधीही विसरू नये.मवहणून शंकर जोगी यांच्यावरील या हल्ल्याचा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेचे संस्थापक-राट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ मराठवाडा विभाग व परभणी जिल्ह्याकडून जाहिर निषेध करण्यात आला आहे..या सर्व हल्लेखोरांवर पत्रकार संरक्षण कायद्या़अंतर्गत गुन्हे नोंदवून कडक कार्यवाही व्हावी.आमच्या पत्रकार बांधवाला
 न्याय द्यावा या मागणीसाठी आज दिनांक 26 ऑगस्ट रोजी परभणी जिल्हाधिकारी यांना लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले आहे. या वेळी महाराष्ट्र राज्य संघटन तथा संपर्क प्रमुख भगिरथजी बद्दर, महिला आघाडी संघटन संपर्क प्रमुख अनिता सरोदे, मराठवाडा संघटन प्रमुख देवानंद वाकळे, मराठवाडा डीजीटल मिडीया संघटन तथा संपर्क प्रमुख वाजीदखान पठाण, मराठवाडा अध्यक्ष अॕड एन.जी.सुर्यवंशी, परभणी जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर, जिल्हा सचिव प्रमोद अंभोरे, डिजीटल मिडिया जि. अध्यक्ष राहुल धबाले, परभणी शहराध्यक्ष शेख इसाक, पत्रकार राजाभाऊ येटेवाड, बालासाहेब घिके, बालाजी कांबळे, सय्यद खदीर, युसुफ पठाण, मो. युनुस, शेख कलीम, सय्यद खिजर, हरिभाऊ सुतारे, हरदिप सिंग बावरी, संजय घनसावंत, सय्यद जमील, रियाज खुरेशी, तेली अप्पा, उमेश अग्रवाल, सामाजिक कार्यकर्ते शेख सरफराज, दीपक पंचांगे, विष्मभर खरात, राहुल शिवभगत, धनंजय नांदापुरकर, शैलेश डहाळे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

    Post Views:  211


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व

संपादकिय

सर्व

Failed to connect to MySQL: Operation not permitted