अकोला पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक कक्षाकडून गुजरातमधून आरोपी ताब्यात


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  12 Aug 2022, 6:41 PM
   

अकोला : अकोला पोलिस विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक कक्षाकडून डाबकी रोड पोलिस स्टेशनच्या हद्दीतील गुन्ह्याचा तपास करण्यात आला असून या प्रकरणात दोन वर्षांपूर्वी दाखल गुन्हा क्र.०७/२० मधील आरोपी व पिडीतेला जुनागड( गुजरात) येथून ताब्यात घेण्यात आले व डाबकी रोड पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे.
    अकोल्याचे पोलिस अधिक्षक जी.श्रीधर व मोनिका राऊत यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक कक्षाकडून महिला व बाल अत्त्याचारामधील भादवी कलम ३६३, ३६६ (अ) मधील तपास सुरू असून आतापर्यंत ३५ गुन्हे व २२ हरविल्याच्या घटनांसह एकून ५७ प्रकरणे उघडकीस आणण्यात आलेली आहेत.
    पोलिस अधिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस संजय खंदाडे,सपोनि महेश गावंडे,पोउपनि सुकेशनी जमदाडे,पोउपनि विजय खर्चे, पोहेकॉ सुरज मंगरूळकर, धनराज चव्हाण, आशिष अघडते, मपोकॉ पूनम बचे, करिष्मा गावंडे,तसेच रामकिसन डोईफोडे,देवानंद खरात एम टी, गणेश सोनवणे, गोपाल ठोंबरे, सायबर सेल यांनी केली‌ईतर गुन्ह्याचेही तपास तत्परतेने सुरू आहेत.

    Post Views:  212


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व