ह्या मोर्चा करिता शालेय विद्यार्थ्यांच्या सह महाविद्यालयीन विद्यार्थी व ओबीसी घटकातील प्रत्येक नागरिकांनी सामील होऊन मोर्चा यशस्वी करावा ह्या करिता आव्हान करण्यात आले आहे, हा मोर्चा जीवन विकास हायस्कूल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघणार आहे. ओबीसी आरक्षण रद्द केल्याने जवळजवळ ९००० च्या वर शासकीय पदे रिक्त झालेले आहेत तर जिल्ह्यामध्ये ०% टक्के ओबीसी दाखवल्याने ओबीसी जनतेमध्ये आक्रोश निर्माण झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्याच १८ गड विविध जाती व धर्मांच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य स्थापन केले त्यानंतर छत्रपती शाहू महाराज यांचे आरक्षण बाबत मोठे योगदान आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेत ३४० वा कलम केवळ ओबीसीसाठी घेतला आहे तर ओबीसी मध्ये ३६० जाती समाविष्ट केल्या आहेत. परंतु ओबीसी ची प्रचंड लोकसंख्या असताना मात्र सत्तेतील आरक्षण सवलती पासून त्यां वंचित ठेवले आहे.. अनेक वर्ष ओबीसीची जनगणना होत नाही झालीस तर प्रस्तावित व्यवस्थेचे धाबे दणाणतील म्हणून जातीनिहाय जनगणना होत नाही. म्हणून ओबीसी ची आरक्षण व जणगणने बाबत ही लढाई लढण्याकरिता सर्व राजकीय पक्षाचे राजकीय हेवेदावे,जोडे बाजूला ठेवून ओबीसी म्हणून प्रत्येक पिढीत येणाऱ्या ओबीसीचे अस्तित्वाचा प्रश्न सरकार दरबारी मांडण्याकरिता २९ एप्रिल च्या लढाई करिता सज्ज झाल्याचे दिसत आहे. Post Views: 297
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay