जीपीए सदस्यांसाठी डॉ.समीर देशमुख ह्यांची सिएमई संपन्न


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  12 Mar 2024, 10:35 AM
   

अकोला : स्थानिक हॉटेल सेन्टर प्लाझा येथे जनरल प्रॅक्टिशनर्स अससोसिअशन अकोला द्वारा सदस्यांसाठी सुप्रसिद्ध आर्थोपेडिक सर्जन डॉ . समीर देशमुख यांचे रोबोटिक् जॉइंट रिप्लेसमेंट सर्जरी ह्या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सीएमई घेण्यात आली . माणसाच्या गुढग्यावर गुढगा बदलण्याची शस्त्रक्रिया रोबोटच्या साहाय्याने कमी वेळात  कशी केल्या जाते ह्याचे प्रात्यक्षिक द्वारे डॉ . समीर देशमुख यांनी मार्गदर्शन केले . रोबोटच्या मदतीने अश्याप्रकारे शस्त्रक्रिया करणारे डॉ. समीर देशमुख हे अकोल्यातील एकमेव आणि विदर्भातील तिसरे सर्जन असून रोबोटच्या मदतीने होणाऱ्या ह्या सर्जरीत वेळ कमी लागतो आणि रुग्ण हा लवकर चालायला लागतो . ह्या सीएमई जीपीएचे अध्यक्ष डॉ. सतीश उटांगळे यांचे अध्यक्षतेखाली पार।पडली . प्रमुख अतिथी स्त्रीरोग तज्ञ  डॉ. सुषमा देशमुख उपस्थित होत्या . प्रस्ताविक डॉ. प्रद्युम्न शाह यांनी केले तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचालन जीपीएचे सचिव डॉ. विनय दांदळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार जीपीए चे कोषाध्यक्ष डॉ . आदित्य नानोटी यांनी मानलेत . ह्या सीएमई कार्यक्रमाला जीपीए चे पदाधिकारी आणि सदस्य डॉ . राजेंद्र अग्रवाल , डॉ . युवराज देशमुख ,डॉ . रवी आलीमचंदानी , डॉ. सुनील बिहाडे ,डॉ . प्रवीण अग्रवाल , डॉ. नरेंद्र गोंड , डॉ. माळोकर , डॉ . योगेश साहू , डॉ . दीपाली भांगडीया , डॉ..प्रियंका देशमुख , डॉ. वर्षा राव , डॉ. प्रशांत सांगळे , डॉ . समीर भुजबळ , डॉ . इंगळे , डॉ . चौरसिया , डॉ. सुनील लुल्ला , डॉ . जाधव , डॉ .नरेंद्र श्रीवास , डॉ. केशव महाशब्दे , डॉ. राजेश काटे , डॉ . खेडकर यांचेसह जीपीए चे सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.

    Post Views:  162


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व