साहित्यिक पंजाबराव वर पुणे येथे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
24 Aug 2023, 1:22 PM
अकोला : येथील सामाजिक कार्यकर्ते, पत्रकारितेत नावलौकीक असलेले साहित्यिक, साप्ता. नारी ललकारचे संपादक, व्हाईस ऑफ मिडीया (सा.विंग)चे जिल्हाध्यक्ष पंजाबराव वर यांना पत्रकारितेतील उत्कृष्ठ कामगिरीबद्दल ‘प्रेस मिडीया लाईव्ह न्यूज’ २० ऑगस्ट २०२३ रोजी आझम वॅâम्पस पुणे येथे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने ज्येष्ठ विचारवंत कुमार सप्तर्षी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. ़कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. आमदार मोहन जोशी, तथा आझम वॅâम्पसचे संस्थापक युनिव्हर्सिटीचे कुलपती डॉ. पी.ए. इनामदार, अॅड. अयुब शेख, आबेदा इनामदार, शाहीद इनामदार, औरंगाबाद युवाचे संपादक अब्दुल कय्युम अब्दुल रशिद, मिडीया लाईव्ह वृत्तसंस्थेचे प्रमुख मेहबुब सर्जेखान आदींची उपस्थिती होती. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या मान्यवरांचा, राज्यभरातील पत्रकारांचा यावेळी सत्कार करण्यात आला. साहित्यिक पंजाबराव वर यांची ‘गाथा रमाईची’, ‘महानायक बिरसा मुंडा’, ‘वNहाडी झटका’ काव्यसंग्रह, ‘भु्रण कन्येचा टाहो’ मोहन पवार चरित्रग्रंथ ‘उरातली धग’ आदी पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांना ‘उत्कृष्ट पत्रकारिता’ पुरस्कार प्राप्त झाल्याने त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Post Views: 108