अकोला जिल्हा व शहरात हत्येच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली असून एका हत्येची घटना व तपास मिटत नाही तोच दुसरी घटना घडत असल्याने कायद्याचे राज्य आहे की नाही हा गंभीर प्रश्न अकोला शहरात उपस्थित झाला आहे.
काल रविवार 30 ऑक्टोबर रोजी शहरातील जठारपेठ येथील भरचौकात सायंकाळच्या सुमारास घडलेल्या हत्येच्या घटनेत उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेना उपशहरप्रमुख विशाल कपलेच्या एका हत्येच्या घटनेची शाई वाळते नाही वाळते तोच पुन्हा एका हत्येची घटना जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीतील हमजा प्लॉट येथे घडली असून अमीन खान अमीत खान वय 30 वर्षे नामक व्यक्तीची आपसी हेवेदाव्यातून हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. एका मागोमाग एक हत्येच्या घटना घडत असल्याने अकोला चांगलेच हादरले आहे.
शहरातील ही 24 ऑक्टोबर पासून एका आठवड्यात लगातार हत्येची चवथी घटना घडली असून नव्यानेच रुजू झालेले जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कमी पडत असल्याच्या प्रतिक्रिया या घटनेच्या निमित्ताने उमटल्याने गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात अपयशी ठरत असल्याचे सद्यस्थितीत दिसून येत आहे. याबाबत प्राप्त माहितीनुसार जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीतील हमजा प्लॉट येथे आज रात्री 8.30 ते 8.45 वाजताच्या सुमारास भंगाराचा व्यवसाय करणाऱ्या भगत वाडी गल्ली नं. 6 मधील रहिवासी असलेल्या 30 वर्षीय अमीन खान अमीत खान याची अज्ञातांनी धारदार शस्त्राने हल्ला करण्यात येवून हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली असून घटने नंतर आरोपी घटना स्थळावरून फरार झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच जुने शहर पोलीसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यास सुरुवात केली आहे. मृतक अमीन खान अमीत खान वय 30 वर्षे यास जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात घटनेनंतर पाठविण्यात आले असता नातेवाईकांचा रुग्णालयात चांगलाच आक्रोश सुरू होता. हत्या नेमक्या कोणत्या कारणाने करण्यात आली याचा तपास सुरू करण्यात आला आहे.
या हत्येसारख्या घटनांनी अकोला शहरवासी चांगलेच धास्तावले असून भीतीचे वातावरण पसरले असून शहरात पोलीसांचा वचकच संपल्याने गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याची चर्चा असून पोलीसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Post Views: 265
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay