कला, क्रीडा ,संगीत, नृत्य यांचा संगम म्हणजे प्रशालेचे स्नेहसंमेलन. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या पुणे विद्यापीठ हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ नुकताच प्रसिद्ध अभिनेता अरुण पटवर्धन व प्रसिद्ध उद्योजक मुकुंद कमलाकर यांच्या हस्ते पार पडला. वर्षभर आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धांमधून यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. आठवी ते दहावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या व 90 टक्के पेक्षा अधिक गुण मिळवणारे गुणवंत विद्यार्थी, क्रीडा क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेले विद्यार्थी, नाट्य व चित्रपट क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे विद्यार्थी या सर्वांचा विशेष सत्कार अरुण पटवर्धन व मुकुंद कमलाकर यांच्या हस्ते करण्यात आला. ,विद्यार्थ्यांनी पोवाडा, शेतकरी नृत्य, कोळी नृत्य, मंगळागौरी, भारुड, एकपात्री नाटक, देशभक्तीपर गीते यांचे दिमाखदार सादरीकरण केले व उपस्थितांची मने जिंकली. सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना कलाविष्कार सादर करण्यास एक चांगला व्यासपीठ उपलब्ध झाले. विद्यार्थ्यांची अभिनय क्षमता पाहून रसिक प्रेक्षकांनी उस्फूर्तपणे टाळ्या वाजवून दाद दिली.


मुख्याध्यापक विष्णू मोरे यांनी प्रास्ताविक केले तर स्नेह संमेलन कार्याध्यक्षा स्मिता जाधव यांनी वर्षभराचा शालेय कार्याचा आढावा अहवालाचे वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख गौरी गोळे यांनी तर आभार संध्या आवेकर यांनी मानले.
याप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक विष्णू मोरे, शिशुविहारच्या मुख्याध्यापिका विजया बराटे, कार्याध्यक्षा स्मिता जाधव, शिक्षकेत्तर प्रतिनिधी सुप्रिया बिरजे, क्रीडा प्रतिनिधी पल्लवी अभंग,विद्यार्थिनी प्रतिनिधी आकांक्षा झोरे, विद्यार्थी प्रतिनिधी मारुती गावडे, ज्येष्ठ शिक्षिका स्नेहा वाघमारे,वैशाली सैंधाणे, संध्या आवेकर, मनोहर निकम, योगेश्वर चव्हाण, प्रमोदिनी कबूले, तेजस्विनी निरगुडे, गौरी गोळे,रेश्मा देवकाते, दीपक आगवणे,सुभाष कांबळे,अपूर्वा आदलिंगे उपस्थित होते. मोठ्या संख्येने विद्यार्थी, शिक्षक,पालक प्रतिनिधी उपस्थित होते.
Post Views: 257