जिल्हा प्रशासनाचा उपक्रमः सायकल रॅलीद्वारे कोविड लसीकरण जनजागृती


 संजय देशमुख  04 Dec 2021, 2:32 PM
   

अकोला,दि.४ : भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यामध्ये कोविड लसीकरण मोहीमेची जनजागृती व्हावीयाकरीता आज सकाळी साडेसात वाजता सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले.

या सायकल रॅलीत स्वतः जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे तसेच विविध विभागांचे शासकीय अधिकारी , कर्मचारी, महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा संस्थांचे प्रतिनिधी, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्रसेना विद्यार्थी आदी सहभागी झाले होते.

आज सकाळी साडेसात वा. जिल्हाधिकारी कार्यालयापासून या रॅलीस जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून  सुरुवात करण्यात आली. त्यानंतर सरकारी बगीचा-जयहिंद चौक-छोटा पूल-सावताराम मिल रोड-मानिक टॉकीज-संतोषी माता चौक मार्गे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वसंत देसाई स्टेडियम येथे या रॅलीचा समारोप करण्यात आला.

    Post Views:  299


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व

संपादकिय

सर्व

Failed to connect to MySQL: Operation not permitted