भित्यापाठी सोडलेला कोरोना ब्रम्हराक्षस आता आवरा ! : संजय एम. देशमुख
एखाद्या माणसाच्या डोक्यावर त्याच त्या गोष्टी आदळत राहिलं म्हणजे ते सांगितलेलं कथानक काल्पनिक जरी असलं तरी त्याचं स्वरुप मोठे आणि करता येईल तेवढे नकली करून दाखवता आले म्हणजे मनुष्याला झुकविण्यासाठी आणि त्यातून आपल्या आर्थिक तुंबड्या भरण्यासाठी एक यशस्वी फंडा हातात लागू शकतो. लहानपणात आमचे आईवडील आणि आजी आजोबांनी, झोप राक्षस आला. दारासिंग आला असं सांगितल्यावर, आणि त्या पात्राच्या भोवती काल्पनिक कथानक जोडल्यावर दारासिंग आणि राक्षसाला कधी प्रत्यक्ष न पाहिलेलं छोटं बाळ झोपी जात होतं. एवढं चांगल्याप्रकारे खोटं सोंग पचवल्या जाऊ शकते.
अवघ्या जगात, आणि आमच्या भारतातही कोरोना नावाच्या विषाणुजन्य ब्रम्हराक्षसानेही अक्षरसः गोंधळ घालून गरीबांना अधिक गरीब आणि मानवता हरविलेल्या गिधाडवृत्तीच्या हरामांना अधिक श्रीमंत करून ठेवलेले आहे. हा इतर अतिसामान्य जीवावर जगणार्या माणूस नावाच्या दोन पायाच्या पशुसमान परजीवी श्वापदांनी मानवी जीवांचा केलेला लिलाव गेल्या दोन वर्षात उघड्या डोळ्यांनी पाहिला जात आहे. पाहूनही काही करता येत नाही. हा येथील माणसांची दुर्बलता आणि न्यायव्यवस्थेची आगतिकता हा लोकशाहीतील सहन न होणारा देवदुर्विलास आहे.
कोरोनाबंधनाच्या नावाखाली राज्यकर्ते सामान्य जनतेला नागवं करून धनाढ्यांचं हितरक्षण करण्यात मग्शुल असल्याचं चित्र दिसत असून सोशल मिडीयातून याबाबत आता संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. पहिल्या लाटेमध्ये कोरोनाचे संक्रमण तिव्र होते. त्यावेळी लोकांचीही रोगप्रतिकारशक्ती अत्यंत दुर्बल होती. त्यामुळे कोरोनाची लागण आणि ते अत्यवस्थ होऊन ऑक्सिजनच्या टप्प्यात जाण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडले, ही गोष्ट नाकारली जाणार नाही. परंतू एक मात्र सत्य आहे आणि ते प्रत्येकाने मान्य करण्यासारखंच आहे. ते म्हणजे यातील अनेक लोकांचे प्राण हे भित्यापोटी सुसाट वेगाने ब्रम्हराक्षस लावल्याने दवाखाण्यात जाईपर्यंत वाटेलच गेले, बहूतेकांचे भरती असणार्या लोकांचे चित्र पाहून आता आपले काय होणार यामुळे झाले. परंतू यापेक्षाही भयंकर चिड आणणार्या अनेक गोष्टी यामध्ये घडलेल्या आहेत. त्या म्हणजे असंख्य रुग्णांचे जीव जागतिक आरोग्य संघटना, केंद्र सरकार व त्यांचा आरोग्य विभाग यांच्या चुकीच्या निर्देशांमुळे, औषधकंपन्यांना मालामाल करण्याकरीता वापरल्या गेलेल्या अतिघातक औषधांच्या अति प्रयोगांमुळे गेलेले आहेत. त्या निरपराध लोकांची आयुष्ये हिरावून घेणार्यांना आमची न्यायव्यवस्था कशी शोधणार आणि काय शिक्षा देणार? यांचे उत्तर न्यायव्यवस्था आणि अंदाज पंचे दाहोदशे कारभार करणार्या सरकारकडूनही जनतेला दिले जाणार नाही.
सध्या कोरोना ओसरलेला आहे. परंतू त्यातच ओमायक्रॉन नावाचे नवे भुत लोकांच्या मानगुटीवर बसविण्यात आले आहे. मागील काही दिवसात केंद्र सरकारनेच राज्याच्या आरोग्य विभागांना कळविले होते. की, सध्या सर्दी पडशाची साथ सुरू आहे. अशातच तपासणी केल्यास ते रुग्ण हमखास पॉझिटिव्हच येऊ शकतात. म्हणून त्रास आणि लक्षणं नसतील तर घरातच उपचार घ्यावेत. मग आता तपासण्या करून त्यातून आलेले नकली पॉझिटीव्हचे आकडे मिडीयातून लोकांसमोर ठेऊन त्याआधारे लोकांवर कडक बंधनं लादण्याचे प्रयोजन काय? गेल्या दोन वर्षात व्यवसाय, धंदे बंद आणि कोरोना तपासण्या आणि उपचारांसाठी चोरांच्या तुंबड्या भरुन देण्याचे कामे चालू आहे. यामुळे सर्वसामान्य नागरीकांवर अत्यंत अगतिकतेचे दारिद्री जीवन जगण्याची महाभयंकर पाळी आलेली आहे. त्यामुळे ह्या नकली तपासण्या ताबडतोब बंद करून तमाम बंधनं झुगारून देण्याची आता वेळ आलेली आहे. या नकली तपासण्यातून काही विदुषकी राजकीय नेते आणि बडे अधिकारीही पॉझिटीव्ह निघून त्याची मिडीयामधून जाहिरात करीत आहेत. त्यांनाही माहिती आहे की, आपल्याला सर्दी आहे, आपण पॉझिटीव्ह येणारच! मग ही हिरोगिरी कशासाठी? काय लोकांना कोरोना अजून गेला नाही, आहेच ही भिती दाखवून तपासण्या आणि लसीकरण करून घेण्यासाठी ह्या लबाड्या सुरू आहेत काय?
लसींचे दोन डोस घेतलेल्या लोकांना कोरोनाच्या संसर्ग झाला किंवा त्यांचा लबाड रिपोर्ट तरी पॉझिटीव्ह दिसलाच, मग लसीकरणाचा प्रभाव काय? तर त्याला लागण झाली तर त्याची लक्षणं सौम्य ठरतात असे लंगडे आणि धादांत बनवाबनवीचे समर्थन या लसीकरणाचे केले जात आहे. “दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिए” या अभ्यासातून बंधनाआडून शासन प्रशासन जनतेला दिवसेंदिवस मुर्ख बनवून घरात डांबवून ठेवण्याचे प्रयत्न करीत आहेत. कोरोना लस घेतलेल्यांना लक्षणं सौम्य हे खोटे समर्थन करण्यापूर्वी ज्यांनी लसी घेतल्या नाहीत त्यांच्या आसपासही कोरोना फिरकलाच नाही. मग उलट दुष्परिणाम करणार्या लसी घेणारांपेक्षा ज्यांना दोन वर्षातही कोणता आजार झालेला नाही त्यांची रोगप्रतिकारशक्ती अधिक असल्याचे सिद्ध होत आहे.
लसीकरणाच्या बाबतीत न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून केंद्र सरकारकडून आम्ही लसीकरणासाठी कोणतीही सक्ती करीत नाही, असे स्पष्ट करून या लोकशाहीतील पवित्र न्यायदेवतेचीही फसवणूक केली जात आहे. हे आंधळ्या देवतेला खरोखरच दिसत नाही काय? इकडे म्हणायचे सक्ती नाही, मग सरकारी कार्यालये, रेल्वे आणि मॉल, दुकानांमध्ये लसीकरण प्रमाणपत्र बंधनकारक करणे हे प्रकार म्हणजे लसीकरणाची जबरदस्ती नाही काय? देशातील जनता आणि त्यांचेसोबत न्याव्यवस्थेसोबतही खोटारडेपणा करणारे हे दोन तोंडाचे राज्यकर्ते देशातील संविधानालाही वेळोवेळी दंश करण्याचे अप्रामाणिक अनैतिक वर्तन करीत आहेत. याची शिक्षा जनतेनेच जनतेच्या दरबारात यांना आता दिली पाहिजे.
केंद्र सरकार, जागतिक आरोग्य संघटना आणि तत्सम यंत्रणांनी चुकीची उपचारपद्धती सांगून जनतेच्या जीवाचा खेळ केला. ही त्यांची बेपर्वाही रेडेमिसिवरपासून तर अनेक बाबतीत उघडी पडली आहे. आता सध्या लक्षणं अत्यंत सौम्य आहेत. स्टेरॉईड्स टाळा सांगण्यापासून तर अनेक मार्गदर्शक सुचना केंद्रसरकारने जाहिर केलेल्या आहेत. दोन वर्षात देशाच्या आर्थिक विकासाचे तिन तेरा वाजले असून लोकंही देशोधडीला लागलेले आहेत.
आता कोरोना ही पहिल्यासारखी गंभीरतेने घेण्याची साथ राहिलेली नाही. ह्या गोष्टी केंद्रसरकारला सांगणे म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी वाहवत राहण्यासारखे आहे. पात्रता नसणारांसमोर वास्तव समाजजीवनाची गीता वाचण्यात कोणतेच हशिल नाही. त्यामुळे आता आपल्या महाराष्ट्र सरकार आणि उद्धव ठाकरेजींनी तरी अनावश्यक बंधनांनी मोठं करून ठेवलेल्या कोरोना नावाच्या ब्रम्हराक्षसाला आपल्या लोकांच्या मागे धावायला लावणं बंद केलं पाहिजे. केंद्र सरकारची अवास्तव असतील ती बंधनं झुगारली पाहिजे. गेल्या काळात धावून धावून बिचार्यांना धापा लागलेल्या आहेत. आता आर्थिक विवंचनातून हृदयविकारासारख्या आजारांनी जर लोकांचे बळी जात राहिले तर तेही आपण कोरोना आजाराचे बळी ठरवून बंधनं अधिक कडक करण्याचे प्रयत्न करणार आहात का? म्हणून हे अविचारी, हास्यास्पद, नकली निर्णय आता थांबवा, तपासण्या तर थांबवाच थांबवा, लसीकरणाशिवाय प्रवेश नाही ही लोकांच्या अधिकारांवर, हक्कांवर गदा आणणार्या गुलामगिरीची सरजामशाही आता बंद करा! लोकांना आता आपली सुरक्षितता कशी ठेवायची हे समजलेलं आहे; त्यांना आता आपल्या जुलूमात जास्त डांबून ठेवण्याचा प्रयत्न करू नका. अन्यथा संतप्त जनता आपणासोबतचे आपलेपणाचे नाते केव्हा तोडेल याची आपण कल्पनाही करू शकणार नाही!
संजय एम.देशमुख,मोबा.क्र.९८८१३०४५४६
Post Views: 376