महायुतीत नवा भिडू -राज ठाकरे दिल्लीला रवाना भाजप - मनसे युती होणार ?
मुंबई - भाजप -शिवसेना-राष्ट्रवादी महायुतीत जागावाटप अंतिम टप्प्यात आले असतानाच या युतीत राज ठाकरेंचा मनसे हा नवा भिडू येण्याची दात शक्यता आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सायंकाळी दिल्लीला रावण झाले असतानाच त्यांच्यापाठोपाठ आता राज ठाकरेदेखील लगोलग दिल्लीला रवाना झाले आहेत .
महाविकास आघाडीची काल शिवाजीपार्क येथे जाहीर सभा संपन्न झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे . महविकास आघाडीच्या सभेला विविध केंद्रीय पक्षांनी सहभाग दाखविला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीदेखील या सभेला हजेरी लावली होती . हि सभा संपन्न झाल्यानंतरभाजपच्या दिल्लीतील नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना सायंकाळी दिल्लीला बोलावून घेतले .
महाविकास आघाडीतील जागावाटप बोलणी अंतिम टप्य्यात अली आहे त्यातच या आघाडीत वंचित बहुजन आघाडीचा सहभाग निश्चित मानला जात असल्याने भाजपकडून आता महायुतीत नवा भिडू घेण्याची चर्चा सुरु झाली आहे . राज ठाकरेंची मनसे लोकसभा निवडणूक लढविणार आहे त्यासाठी राज ठाकरेंच्या राज्यात ठिकठिकाणी बैठका सुरु असून मुंबईतून मनसे एक जागा तर अन्य ठिकाणीदेखील काही उमेदवार लढविण्याची शक्यता आहे . त्यामुळे मतविभागणी होण्यापेक्षा महायुतीत मतांचा टक्का वाढविण्यासाठी हिंदुत्व हि नवी संकल्पना घेऊन वाटचाल करीत असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे याना देखील सोबत घेण्याचे प्रयत्न केंद्रीय स्तरावरून सुरु झाले आहेत, राज ठाकरे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांच्या वरच्यावर गाठीभेटी घेतल्या या भेटीत महायुतीत सहभागी होण्याविषयी चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले . फडणवीस यांनी मनसेला सोबत घेणे किती सोयीचे होईल याविषयी पक्षश्रेष्टींना कल्पना दिल्यानंतर ठाकरे याना त्वरित दिल्लीला येण्याचे निमंत्रण देण्यात आल्याचे समजते .
Post Views: 230