श्रमिक कामगार संघाच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण....
विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अनेक समाजसेवी मान्यवरांचा गौरव
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
27 Aug 2026, 1:52 PM
(देवेंद्र मेश्राम)
पालघर....कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन करत थोर महा संतांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी मान्यवर व अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे समाजसेवी यांची उपस्थिती....
गुरु रविदास चॅरिटेबल ट्रस्ट तथा महाराष्ट्र ग्रामीण व शहरी श्रमिक इमारत बांधकाम कामगार संघांच्या वतीने शासकीय विश्रामगृह, भोकरदन येथे शुक्रवार (दि. २१) रोजी राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला. संघाचे संस्थापक अध्यक्ष महादूजी सुरडकर यांच्या हस्ते विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजसेवी मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती मदनराव कुलकर्णी, नगरसेविका शीलाताई भारती, भारती सर, दत्ता ठाले, लक्ष्मीबाई लोखंडे, लक्ष्मीबाई बारोटे, दादाराव पालकर, उत्तम भारती, यशोदाताई मदनकर, मापारी, डॉ. शहा, भगवान बनकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी राजू पुंडलिक वंजारे, छाया सरोदे आणि अभिजीत वैद्य (बीड) यांच्यासह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणान्या व्यक्तींना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.पालघर जिल्यातील बोईसर येथील आधार सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष,पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ पालघर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख, मानद डॉ देवेंद्र मेश्राम यांना संस्थेच्या वतीने समाजरत्न पुरस्कार 2026 देऊन सन्मानित करण्यात आले.श्रमिक व कामगारांच्या प्रशांसाठी तसेच सामाजिक क्षेत्रांत कार्य करणान्या व्यक्तींच्या योगदानाची दखल घेऊन त्यांचा सन्मान व्हावा, या उद्देशाने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगीतले.कार्यक्रम अतिशय आनंदात पार पडला. कार्यक्रच्या शेवटी संस्थेच्या वतीने स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले होते.सर्वांनी भोजनाचा स्वाद घेत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.पुरस्कार मिळालेल्या सर्व मान्यवरांचे उपस्थितांनी अभिनंदन केले.
Post Views: 42