श्री महादेवगौरक्षण संस्थान द्वारा संचालित, श्रीसंतजंगलीमहाराजइंग्लिशस्कूलअँडज्युनिअरकॉलेज मध्ये आम्ही वसुंधरासप्ताह साजरा करत आहोत. झाडे , लाकडे आग न पेटवता आम्ही दि. 17 ला, होळीचा पर्यावरण पुरक असा पवित्र उत्सव साजरा केला. दि. 19 ला वसंतोत्सव निमित्तान, आम्ही पालक आणि विद्यार्थ्यांना 700 रोप झाडे वाटप केले, याला पालक आणि विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला.
दि. 20 ला तुकाराम बिज निमित्ताने संत श्री तुकाराम महाराज ज्यांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरे असा संदेश दिला त्यांचा हा संदेश प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यासाठी श्री संत जंगली महाराज इंग्लिश स्कुल अँड जुनिअर कॉलेज चे प्राचार्य श्री विश्वास मापारी सर यांनी एक मूल एक झाड या योजनेचे उद्घघाटन आपल्या हस्ते विद्यार्थ्यांना झाड देऊन केले. शिक्षकांनी विद्यार्थी आणि पालकांना चांगल्या पर्यावरणासाठी झाडे किती उपयोगी आहे आणि त्याचे महत्त्व त्यांना पटवून दिले. त्या पूर्वी प्रत्येक वर्गात मुलांना पर्यावरणविषयक माहिती देण्यात आली. पालक आणि विद्यार्थी ही झाडे लावण्यासाठी उत्सुक होते.या प्रक्रियेत आम्हाला हे देखील कळले की तुम्ही विद्यार्थ्यांनच्या मनात पर्यावरण विषयी चांगला संदेश जाऊ शकतो. एकमूल एकझाड ही योजना शिक्षण , संवर्धन आणि मुलांना पर्यावरणाच्या रक्षणाबद्दल आणि देशात वृक्ष लागवडीला चालना देण्याबाबत जागरूक करण्यासाठी आयोजित करण्यात आली. हा एक अशी योजना आहे जी देशाच्या बदलत्या लोकसंख्येचा फायदा घेत ग्लोबल वॉर्मिंग विरुद्ध लढा देते.

20 मार्च ला चिमणीदिवस च्या निमित्ताने मुलांना पशुपक्षी व जंगल ह्यांचे पर्यावरणातील महत्त्व शिक्षकांनी समजून सांगितले व त्यावर निबंध स्पर्धा घेण्यात आली..पक्ष्यांसाठीघरटे ही स्पर्धा जाहीर करण्यात आली.ह्या प्रसंगी शाळेत विद्यार्थ्यांच्या हस्ते नागार्जुन रोपवाटिका चा शुभारंभ करण्यात आला. ज्या मध्ये विद्यार्थी स्वतःपिशव्या भरून व बिज लावून रोपवाटिका तयार करतील व वृक्षवाटप करतील. संस्थेचे अध्यक्ष माननीय आमदार राजेशजी एकडे साहेब, सदस्य रवि ठाकूर सर,उमेश सुरडकर सर ह्यांचे मार्गदर्शनाखाली सदर उपक्रम राबविण्यात आले.
पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी ह्या योजनेत खूप उस्फुर्त पणे भाग घेतला.या वेळेस श्री संत जंगली महाराज इंग्लिश स्कुल अँड जुनिअर कॉलेज चे प्राचार्य श्री विश्वास मापारी सर,श्री प्रविण गिरी सर,श्री विलास धोरण सर,श्री शैलेश ठाकुर सर,श्री श्याम क्षिरसागर सर,श्री नितिन ढोले सर, पंकज गायकवाड सर, अमोल अवकाळे सर,कविता मानकर मॅडम,निकिता मांडवे मॅडम, अर्चना साठे मॅडम,अनिता इंगळे मॅडम, कल्पना खोद्रे मॅडम, निकिता पांडव मॅडम ,धनश्री मलिक मॅडम,कांचन बाठे मॅडम, वनिता वडोदे मॅडम,निकिता माहुरे मॅडम,राधिका उधानी मॅडम ,शीतल हिवरखडे मॅडम, वेरुळकर मॅडम, गावंडे मॅडम, प्रगती डंबेलकर मॅडम ,दिशा अमलकर मॅडम उपस्थित होते.
Post Views: 284